Kshitija Ghosalkar Ukhana Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kshitija Ukhana Video: लग्नानंतर सासरच्या घरामध्ये एन्ट्री करताना क्षितीजाने घेतला हटके उखाणा, प्रथमेशच्या चित्रपटांचा बोलून दाखवला पाढा

Kshitija Ghosalkar Ukhana Video: लग्नानंतर प्रथमेशच्या घरी म्हणजेच सासरच्या घरामध्ये एन्ट्री करताना क्षितीजाने जबरदस्त उखाणा घेतला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

Prathamesh- Kshitija Wedding:

मराठी सिनेसृष्टीचा 'दगडू' अर्थात प्रथमेश परबने (Prathamesh Parab) गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत (Kshitija Ghosalkar) लग्न केले. २४ फेब्रुवारीला नवी मुंबईमध्ये मोठ्या थाटामाटामध्ये या कपलचा विवाहसोहळा पार पडला. दोघांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये त्यांचे लग्न झाले. या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नानंतर प्रथमेशच्या घरी म्हणजेच सासरच्या घरामध्ये एन्ट्री करताना क्षितीजाने जबरदस्त उखाणा घेतला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

क्षितीजा घोसाळकरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर सासरच्या घरामध्ये एन्ट्री करताना घेतलेला उखाण्याचा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत क्षितीजाने कॅप्शनमध्ये 'अहोंसाठीचा उखाणा', असे लिहिले. यासोबतच क्षितीजाने कॅप्शनसोबत हार्ट इमोजी पोस्ट करत प्रथमेशवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

व्हिडीओमध्ये क्षितीजा उखाणा घेताना बोलता की, 'हृदयी वसंत फुलताना वाढला होता थोडासा 'बीपी', डॉक्टर डॉक्टर बोलावले तेव्हा कुठे स्थिर झाला आयुष्याचा डीपी, प्रेम आमचं खरं आहे नाही थिल्लर 'टाईमपास', प्रेमाच्या परीक्षेत दोघांनीही मिळवली १०० टक्के आणि नाही झालं कोणी '३५ टक्के काठावर पास', जोडी आमची 'टकाटक' आहे एक नंबर, खिचिक खिचिक करत लोकंही काढतात फोटो १००, 'ढिशक्यॅव' धुमधडाक्यात पडला होता पार साखरपुडा, मेहंदीच्या दिवशी 'डिलिव्हरी बॉय'ने आणून दिला सौभाग्याचा चुडा, लग्नही झालं आज थाटामाटात झालो आम्ही 'उर्फी', आयुष्यभर एकमेकांना भरवू आनंदाने बर्फी, प्रथमेशच्या प्रत्येक कॅरेक्टरची आहे प्रेक्षकांच्या मनावर एक गोड झरप, आता माझीही नव्याने ओळख करून देते सौ. क्षितीजा प्रथमेश परब.'

क्षितीजा खूपच सुंदर उखाणा घेते. त्यानंतर घरातील मंडळी तिचे कौतुक करतात. त्यानंतर प्रथमेश हात जोडून मला नका नाव घ्यायला सांगू अशी विनंती करतो. त्याच्या हातामध्ये असलेले लग्नात मिळालेला आहेर असलेली पैशाची पाकिटं देऊन मला नका सांगू नाव घ्यायला असे तो म्हणतो. 'मी माप ओलांडतो वाटलं तर.', असं तो म्हणतो. त्यानंतर सर्वजण हसू लागतात. क्षितीजाने शेअर केलेल्या उखाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओला पसंती देत प्रथमेश चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur News: पाण्याचा वेग ठरला जीवघेणा; चंद्रभागा नदीत बुडून २ महिला भविकांचा मृत्यू|VIDEO

Baby Care Guide: दात येत असलेल्या लहान मुलांना 'या' गोष्टी देणे टाळाच

Maharashtra Live News Update: नागपुरात चोरट्याकडून तब्बल २७ दुचाकी जप्त

Cooking Oil Hygiene : या चुका टाळा अन्यथा पावसाळ्यात तेल होऊ शकतं खराब

Politics: 'होय.. मुंबईतील डान्स बार माझ्याच पत्नीच्या नावावर' परबांच्या आरोपानंतर रामदास कदमांची कबुली

SCROLL FOR NEXT