Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prathamesh Parab: अखेर दगडूला प्राजू भेटलीच, प्रथमेश परबच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का?; म्हणते - 'माझ्यासाठी जगाचा अर्थ...'

Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar: नुकताच प्रथमेश परबने आपला ३० वा वाढदिवस (Prathamesh Parab Birthday) साजरा केला. आपल्या आयुष्यातल्या स्पेशल व्यक्तीसोबत म्हणजेच गर्लफ्रेंडसोबत प्रथमेशने वाढदिवस साजरा केला.

Priya More

Prathamesh Parab Girlfriend:

‘टाईमपास’ (Timepass Movie) या चित्रपटातील 'दगडू' अर्थात अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) सध्या चर्चेत आला आहे. टाईमपास चित्रपटामध्ये प्राजूचे प्रेम मिळवण्यासाठी दगडूने खूप प्रयत्न केले. या चित्रपटातील दगडू आणि प्राजूची लव्हस्टोरी प्रेक्षकांना प्रचंड आवडली.

आता दगडू अर्थात प्रथमेशला रिअल लाइफमधील प्राजू मिळाली आहे. नुकताच प्रथमेश परबने आपला ३० वा वाढदिवस (Prathamesh Parab Birthday) साजरा केला. आपल्या आयुष्यातल्या स्पेशल व्यक्तीसोबत म्हणजेच गर्लफ्रेंडसोबत प्रथमेशने वाढदिवस साजरा केला. याचा व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रथमेश परबने व्हॅलेंटाईन डेला प्रेमाची कबुली दिली होती. त्याने त्याची गर्लफ्रेंड क्षीतिजा घोसाळकरसोबतचे फोटो शेअर केले होते. तेव्हा देखील प्रथमेशला खऱ्या आयुष्यातील प्राजू भेटल्याची चर्चा रंगली होती. पण यावर प्रथमेशने अधिकृत घोषणा केली नव्हती. पण आता प्रथमेशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या गर्लफ्रेंडने म्हणजेच क्षीतिजाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत प्रथमेशला जबरदस्त स्टाइलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. प्रथमेशने क्षीतिजासोबत बर्थडे सेलिब्रेशन केल्याचा हा व्हिडीओ आहे.

प्रथमेश परबची गर्लफ्रेंड क्षीतिजा घोसाळकरने जबरदस्त स्टाइलमध्ये प्रथमेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत प्रेम व्यक्त केले आहे. तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रथमेशसोबत वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिने या पोस्टमध्ये प्रथमेशवरील प्रेम व्यक्त केले आहे. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत असून दगडूला प्राजू मिळाली असल्याचे आता कन्फर्म झाले आहे. तिने ही पोस्ट करताना प्रथमेशला देखील टॅग केले आहे. या पोस्टमध्ये तिने #pratija असा हॅशटॅग देखील वापरला आहे.

क्षीतिजाने इन्स्टा पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'तू माझ्या आयुष्यात प्रवेश केल्यापासून, सर्वकाही उजळताना दिसत आहे. मी खूप भाग्यवान आहे की, मला तुझ्यासारखा विचार करणारा, काळजी घेणारा आणि गोंडस कोणीतरी भेटला आहे. तू अविश्वसनीय आहेस आणि तू मला दररोज प्रेरणा देतोस. मला खूप आनंद झाला आहे की तू माझा माणूस आहेसे. माझ्यासाठी जगाचा अर्थ असलेल्या माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...' तसंच, 'तुझा वाढदिवस साजरा करताना तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे तुला कळावे अशी इच्छा आहे. भविष्यातील सर्व वाढदिवस तुमच्यासोबत साजरा करण्याची वाट पाहू शकत नाही.', असे देखील तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, प्रथमेश परब सध्या क्षितिजा घोसाळकरला डेट करत आहे. क्षीतिजा ही एक बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे. ती फॅशन डिझायनिंग सुद्धा करते. महत्वाचे म्हणजे ती प्रथमेशच्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रीमियरला आवर्जून उपस्थिती लावते. ती प्रथमेशला त्याच्या प्रत्येक कामात मदत करते. प्रथमेश आणि क्षीतिजा हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे आता कन्फर्म झाले आहे. प्रथमेशला रिअल लाइफमध्ये प्राजू भेटल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

MNS Manifesto: आम्ही हे करु! गडकिल्ले, रोजगार ते महिलांची सुरक्षा, मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध!

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

SCROLL FOR NEXT