Prasad Oak SAAM TV
मनोरंजन बातम्या

Prasad Oak : ...हा श्री नटराजाचा आशीर्वाद! प्रसाद ओक साकारणार 'बाबुराव पेंटर' यांची भूमिका

Prasad Oak New Movie : मराठी अभिनेता प्रसाद ओकने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. तो आता 'बाबुराव पेंटर' यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Shreya Maskar

मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) कायमच आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहे. तो कोणत्याही भूमिकेत जीव ओततो. आजवर चित्रपट विश्वात अनेक महान लोकांचे चरित्रपट होऊन गेले आहेत. यातून आजच्या पिढीला जुन्या लोकांच्या महान कामाला पाहता आले. नव्या वर्षात अशाच एका महान व्यक्तीची गोष्ट आपल्याला मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत 'बाबुराव पेंटर' (Baburao Painter) हे नाव गाजले आहे. यांचा मराठी चित्रपटसृष्टी उभी करण्यात मोलाचा वाटा आहे. मराठी चित्रपटांमध्ये हल्ली वैविध्यपूर्ण विषयांवरील सिनेमा बनताना दिसतात आणि आता अशा एका महान व्यक्तीवर चित्रपट होतोय ही मराठी सिनेमा विश्वात अभिमानाची गोष्ट आहे. हा चित्रपट नक्कीच आपल्याला विचारांना नवी दिशा देईल. 'बाबूराव पेंटर'च्या भूमिकेत आपल्याला अभिनेता प्रसाद ओक पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या घोषणेची एक खास पोस्ट अभिनेता प्रसाद ओक यांनी सोशल मीडियावर केली आहे.

प्रसाद ओक पोस्ट

"मराठी चित्रपट सृष्टी उभी करण्यात मोलाचा वाटा असणारी अनेक व्यक्तिमत्व होऊन गेली. त्यातलंच एक महत्वाचं आणि मानाचं नाव म्हणजे "बाबुराव पेंटर"...."बाबुराव पेंटर" यांच्या जीवनावर आधारित एक भव्य दिव्य कलाकृती निर्माण होत आहे. मदन माने आणि त्यांची संपूर्ण टीम ही कलाकृती निर्माण करण्यासाठी अविरत झटत आहे… चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, इंजिनियर, छायाचित्रकार अशा अनेक बाजू लिलया सांभाळणारा हा अवलिया म्हणजेच "बाबूराव पेंटर"

"बाबूराव पेंटर" यांची भूमिका साकारायला मिळणं हा श्री नटराजाचा आणि गणपती बाप्पाचा मला मिळालेला आशीर्वाद आहे असं मी मानतो. ही भूमिका साकारण्याची संधी मला देणारे आमचे दिग्दर्शक मदन माने यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. माझ्या आजपर्यंतच्या सर्व कलाकृतींवर आपण मायबाप रसिकांनी जसं प्रेम केलंत जसा आशीर्वाद दिलात तसंच प्रेम आणि आशीर्वाद या ही भूमिकेला आणि कलाकृतीला मिळो हीच रसिक मायबाप चरणी प्रार्थना…"

'बाबुराव पेंटर' यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात कोण कोण कलाकार दिसणार आणि चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार ही माहिती अद्याप खुलासा झाला नाही. मात्र प्रसाद ओकच्या अभिनयाने ही चित्रपट आणि भूमिका दमदार गाजणार यावत काही शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT