पुणे, सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर साकारलेल्या सोलापूर जिल्ह्याला वरदायिनी, तर देशोदेशीच्या स्थलांतरित पक्ष्यांची 'पंढरी' ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विदेशी पाहुणे पक्ष्यांच्या आगमनाला प्रारंभ झाला आहे.
उजनी जलाशयात विविध जातीचे पक्षी अन्न पाण्याच्या शोधात दरवर्षी येत असतात. थंडीच्या मोसमात आशिया, उत्तर सैबेरिया, केनिया ऑस्ट्रेलिया मधून फ्लेमिंगो पक्षी या परिसरात दाखल होतात.
हिवाळ्यात ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये या पक्ष्यांचे आगमन होत असते. सध्या विदेशातील हजारो किलोमीटरचा पल्ला पार करून फ्लेमिंगो (रोहित) पक्षांचे आगमन शेकडोंच्या संख्येने झाले आहे.
फ्लेमिंगो पक्षाची लाल चोच, लांबसडक मान, गुलाबी पंख असे लोभस रूप असल्यामुळे या पक्षाला अग्निपंख या नावानेही ओळखले जाते.
दरवर्षी उजनी जलाशयात पाण्यासाठयातील उथळ पाण्याच्या ठिकाणी येणारे हे पक्षी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असते. या पक्षांना बघण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे गर्दी करतात.
फ्लेमिंगो पक्षांचे थवे पाहण्यास सोबतच त्यांच्या जलक्रीडा पाहण्यासाठी आणि त्यांचे विहंगम छायाचित्र काढण्यासाठी पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकार यांच्या कॅमेऱ्यांच्या नजरा आता उजनी जलाशयाकडे वळल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी एकच गर्दी झालेली बघायला मिळत आहे.
Edited By : Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.