Dharmavir Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dharamveer: 'धर्मवीर' पुन्हा येतोय, आनंद दिघेंची भूमिका करणाऱ्या प्रसाद ओकनं दिले संकेत, पुढच्या भागात काय?

धर्मवीर चित्रपटाचा पुढील भाग नक्की येणार यावर अखेर शिक्कामोर्तब झाला पण चित्रपट कधी प्रदर्शन होणार याविषयी अद्याप माहिती अस्पष्ट आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dharmaveer Film : गेल्या काही दिवसांपूर्वी प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'धर्मवीर' चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता कैक महिने लोटले आहेत. पण चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ कायम दिसत आहे.

चित्रपटाची कथा आणि पात्र हे प्रत्येकाला भावणारे होते. चित्रपटात मुख्य भूमिकेत प्रसाद ओक होता, त्याने चित्रपटात धर्मवीर आनंद दिघेंचे पात्र साकारले होते. त्यांचे बऱ्यापैकी डायलॉग अजूनही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

धर्मवीर आनंद दिघेंचे प्रसाद ओकने साकारलेले पात्र सर्वांनाच भावले होते. संपूर्ण चित्रपटात प्रसादने आनंद दिघेंचे पात्र साकारताना तो ते पात्र जगला असे सुद्धा म्हटले तर वावगे ठरणार नाही. या चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाईने केली होती तर चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडेने केले होते.

चित्रपटाच्या पहिल्या भागाने चांगलंच यश मिळवलं होतं. सोबतच चाहत्यांसाठी आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. चित्रपट प्रदर्शनानंतर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चर्चा सुरू झाली होती. पण आता चित्रपटाच्या आगामी भागाची तयारी सुरू झाल्याचेही संकेत मिळाले आहे.

आज चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडेचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता प्रसाद ओकने एक खास पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्टमध्ये प्रसादने वाढदिवसानिमित्त शूटिंग दरम्यानचा एक फोटो शेअर करत लिहिले की, ''प्रिय प्रवीण... वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा...!!!

माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर आलेलं हे प्रसन्न हास्य कायम ठेवण्याचा प्रयत्न मी #धर्मवीरच्या पुढच्या भागातही करेन अशी खात्री देतो. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत आणि तुझ्या सर्व कलाकृतींना भरघोस यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!!!''

धर्मवीर चित्रपटाचा पुढील भाग नक्की येणार यावर अखेर शिक्कामोर्तब झालं, पण चित्रपट कधी प्रदर्शित होणार याविषयी अद्याप माहिती अस्पष्ट आहे. धर्मवीर चित्रपटात सर्वात शेवटच्या भागात आनंद दिघेंचा अपघात होतो आणि नंतर काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले आहे.

शेवटी एका पत्रकाराची भूमिका निर्माते मंगेश देसाईंनी साकारली आहे. तो पत्रकार शेवटी काही प्रश्न उपस्थित करताना दिसला. त्यावेळीच धर्मवीरचा पुढचा भाग येणार हे स्पष्ट झाले होते, पण आता प्रसाद ओकनेच तसे संकेत दिले आहेत. आता धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग कधी येतोय, याची प्रतीक्षा प्रेक्षकांना आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पारा घसरला, मुंबई-पुण्यासह राज्यात थंडीची लाट

Ajit Pawar : पक्षाने आम्हाला कोललं तर... पुणे जिल्हाध्यक्षांचा अजित पवारांना इशारा, इंदापूरमध्ये नेमकं काय घडतेय?

Winter Update : हुडहुडी वाढली! तापमान २ ते ८ अंशांनी घसरलं, मुंबई पुण्यासह राज्यात गुलाबी थंडी

Renuka Shahane : "मला धाकट्या बहिणीसारखं वागवायचा..."; रेणुका शहाणेंनी सांगितली लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण

Delhi Car Blast : उमरने कारसह स्वत:ला उडवले, दिल्ली ब्लास्टचा न पाहिलेला व्हिडिओ समोर, अयोध्याही होतं दहशतवाद्याचे टार्गेट

SCROLL FOR NEXT