Nana Patekar Upcoming Web Series Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nana Patekar: नाना पाटेकरांचे ओटीटीवर पदार्पण, 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत पुन्हा एकदा दिसणार

सामाजिक विषयांना वाचा फोडणारे दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आगामी 'लाल बत्ती' या वेबसीरिजमध्ये नाना पाटेकर दिसणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Lal Batti New WebSeries: मराठी सिनेसृष्टीत प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने भुरळ घालणारे नाना पाटेकर प्रत्येकाचे आवडते अभिनेते आहेत. गेल्या काही दशकात त्यांनी बऱ्याच सिनेमांमध्ये महत्वाची भूमिका साकारली. त्यांच्या अभिनायाची भुरळ प्रेक्षकांमध्ये कायम आहे. त्यांनी आतापर्यंत मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत चित्रपटांमध्ये काम केले आहेत. संपूर्ण जगभरात टाळेबंदी झाल्यानंतर बराच प्रेक्षकवर्ग वेबसीरिजकडे वळले.

प्रेक्षकांना वेबसीरिजचा विषय सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच काही कलाकारांनी ओटीटी विश्वात पदार्पण केले आहेत. आता मराठी चित्रपसृष्टीतील नावाजलेले ज्येष्ठ कलाकार ही ओटीटी विश्वात पदार्पण करत आहेत. त्यांनी बॉलिवूडच्या माध्यमातून ओटीटीमध्ये पदार्पण केले आहे. नाना पाटेकर आपल्या अभिनयाने तर प्रसिद्ध आहेत, पण सोबतच ते आपल्या रोखठोक आणि परखड मतांमुळे अधिक चर्चेत असतात.

नाना पाटेकर समाज कार्यातही कार्यरत असतात. सामाजिक विषयांना वाचा फोडणारे दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आगामी वेबसीरिजमध्ये नाना पाटेकर दिसणार आहेत. 'लाल बत्ती' असे या वेबसीरीजचे नाव असून नाना पाटेकर दोन वर्षानंतर पडद्यावर झळकणार आहेत. दिग्दर्शक प्रकाश झा यांच्याबरोबर नाना पाटेकर यांनी ‘अपहरण’, ‘राजनीती’ हे दोन चित्रपट केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार नाना पाटेकरांसोबत मेघना मलिक सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी मेघना मिर्जापुर, अरण्यक आणि बंदिश बॅंडिट्स या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. ही वेबसीरिज राजकारणावर चित्रित करण्यात आली आहे. या वेबसीरिजमध्ये मेघना नानांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

दिग्दर्शक प्रकाश झा मूळचे बिहारचे. गेल्या तीन दशकांहून अधिक ते चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. दिग्दर्शक प्रकाश झा यांनी प्रेक्षकांना आजवर ‘गंगाजल’, ‘मृत्युदंड’, ‘अपहरण’ आणि ‘चक्रव्यूह’ सारखे चित्रपट दिले आहेत. सोबतच प्रकाश झा यांनी 'गंगाजल २' आणि 'सांड की आंख' सारख्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहे. याआधी दिग्दर्शक प्रकाश झा यांची 'आश्रम' वेबसीरीज बरीच गाजलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंचं निवडणूक आयोगाला चॅलेंज; निवडणुका घेऊनच दाखवा

Maharashtra Live News Update : नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना ई-रिक्षा वाटप

कंबरेला स्पर्श, किस करण्याचा प्रयत्न; दिवाळीच्या जत्रेत मुलीशी छेडछाड, घटनेचा Video Viral

Shehnaaz Gill: दिवाळी स्पेशल शहनाज गिलचा क्यूट व्हेल्व्हेट अनारकलीतील लूक, पाहा PHOTO

Blackheads: चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स होतील गायब, स्कीन करेल ग्लो; फक्त करा 'या' सोप्या गोष्टी

SCROLL FOR NEXT