Parampara Movie Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Parampara Movie: 'परंपरा' २६ एप्रिलला येणार भेटीला, मिलिंद शिंदे आणि वीणा जामकर मुख्य भूमिकेत

Parampara Movie Poster: प्रणय निशिकांत तेलंग दिग्दर्शित 'परंपरा' हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेते मिलिंद शिंदे आणि वीणा जामकर एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.

Priya More

Milind Shinde And Veena Jamkar:

मराठी सिनेरसिकांसाठी हे वर्ष खूपच खास आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून मराठीमध्ये अनेक चांगल्या धाटणीचे आणि कंटेट असलेले चित्रपट भेटीला येत आहेत. काही चित्रपटांची घोषणा झाली आहे तर काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशातच आता आणकी एक जबरदस्त चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रणय निशिकांत तेलंग दिग्दर्शित 'परंपरा' हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेते मिलिंद शिंदे आणि वीणा जामकर एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.

आपल्या संस्कृतीमध्ये अनेक विविध परंपरा आहेत. या परंपरा पाळताना अनेकदा आर्थिक ओझंही येते. अशाच एका परंपरेची गोष्ट 'परंपरा' या आगामी चित्रपटात मांडली जाणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला 'परंपरा' हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. हरीश कुमार आणि अँड्र्यू रिबोलो यांच्या स्टार गेट मूव्हीज या निर्मिती संस्थेअंतर्गत परंपरा या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. फैजल पोपरे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

चित्रपटाची कथा, दिग्दर्शन प्रणय निशिकांत तेलंग यांचे आहे. या चित्रपटामध्ये अभिनेते मिलिंद शिंदे, अभिनेत्री वीणा जामकर, प्रकाश धोत्रे, अरूण कदम, किशोर रावराणे, जयराज नायर, रोहित चव्हाण, प्रशांत नेमाण, मास्टर मच्छिंद्र, दिवंगत अभिनेते जनार्दन परब हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची पटकथा प्रणय निशिकांत तेलंग आणि संजय सावंत यांची असून छायाचित्रण निशा तेलंग यांनी केले आहे. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना आनंद मेनन यांचे सुमधुर संगीत लाभले आहे.

श्रीकांत तेलंग यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे तर पार्श्वसंगीत विजय गवंडे यांचे आहे. संस्कृती, रूढी, परंपरा जपताना अल्पभूधारक माणसाची होणारी फरफट चित्रपटाच्या केंद्रस्थानी असणआर आहे. या चित्रपटामध्ये नेमकी कोणती परंपरा दाखवण्यात आली आहे ज्याचा त्या कुटुंबाला फटका बसतो? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर म्हणजे २६ एप्रिलला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon 2026 Update: जूनमध्येही उष्णतेचा तडाखा कायम; महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस

Maharashtra News Live Update: अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

९० किमी वेग, धडकी भरवणारं वादळ धडकणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, कुठे कोसळणार धो-धो पाऊस?

T20 वर्ल्ड कप खेळणारा संघ निलंबित; IPL होताच ICCची मोठी कारवाई

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT