मराठी सिनेसृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते किरण माने (Actor Kiran Mane) हे सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. सोशल मीडिया पोस्टद्वारे ते स्पष्टपणे आणि बेधडकपणे आपले मत मांडत असतात. राजकीय असो, सामाजिक असो कोणत्याही विषयांवर ते थेट बोलताना दिसतात. त्यांच्या या पोस्ट देखील चर्चेत असतात. त्यांचा स्पष्टपणा चाहत्यांना देखील प्रचंड आवडतो. राजकारणात प्रवेश केल्यापासून ते सतत ते राजकीय नेत्यांबद्दल पोस्ट करत त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. अशामध्ये आता किरण माने यांनी आता थेट भाजपवरच (BJP) निशाणा साधला आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली असून व्हायरल होत आहे.
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर किरण माने यांनी वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेमध्ये (Shivsena) दोन गट पडले. काही राजकीय नेते हे भाजपमध्ये गेले तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेटे भाजपच्या वाटेवर आहेत. हाच मुद्दा आता किरण माने यांनी उचलून धरला असून त्यांनी थेट भाजपवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून सध्या भाजपच्या कार्यकर्त्यांची नेमकी काय अवस्था झाली आहे ते त्यांनी सांगितले आहे.
किरण माने यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'थोडक्यात काश्मीरपास्नं मंदिरापर्यंत आदळआपट करूनबी जनसामान्यांच्या मनात स्थान न मिळवल्यामुळं, शिवसेनेचं कुंकू, राष्ट्रवादीचं मंगळसूत्र, काँग्रेसची जोडवी घालायची नामुष्की आलेल्या भाजपाची अवस्था, “सतरा नवरे… एकीला न आवरे!” अशी झालीय… आन् भाजपाच्या कार्यकर्त्यांची अवस्था? आरारारारा…' किरण माने यांनी या पोस्टद्वारे भाजपला चांगलाच टोला लगावला आहे.
किरण माने हे गेल्या काही दिवसांपासून सतत राजकीय परिस्थितीवरच पोस्ट करत आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत सत्तेत असलेल्या शिवसेना आमदारांवर निशाणा साधला होता. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले होते की, 'बाळासाहेबांच्या विचारांच्या, धनुष्यबाण चिन्ह दिमाखात मिरवणार्या शिवसेनेला २०१४ मध्ये २० तर २०१९ मध्ये २३ जागा मिळाल्या होत्या… यावेळी ‘हिंदूत्वा’साठी सुरतमार्गे गुवाहाटी गाठणारी, नार्वेकरांनी ‘खरी’ ठरवलेली शिवसेना बाळासाहेबांचं नाव राखण्यासाठी ‘पंचवीस’ जागा तरी मिळवणारच! ये मेरी गॅरंटी है.' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनंतर आता त्यांनी थेट भाजपवर टीका केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.