CLUB 52 Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

CLUB 52 Teaser: फक्त पत्त्यांचा नाही, हा खेळ आहे डेरिंगचा..., राणादाच्या 'क्लब 52'चा धमाकेदार टीजर पाहिलात का?

Hardik Joshi Movie Club 52: हार्दिक जोशीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'क्लब 52' या चित्रपटाचा टीजर शेअर केला आहे.

Priya More

CLUB 52 Teaser Out:

'तुझ्यात जीव रंगला' (Tuzyat Jeev Rangala) या मालिकेतून राणादाच्या भूमिकेत घराघरामध्ये पोहचलेला अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'क्लब 52'मुळे (CLUB 52 Movie) चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हार्दिक जोशी मराठी सिनेसृष्टीत मुख्य अभिनेत्याच्या रुपाने पदार्पण करणार आहे. हार्दिकच्या 'क्लब ५२' या चित्रपटाचे काही दिवसांपूर्वी पोस्टर त्यानंतर हार्दिक जोशीचा फर्स्ट लूक समोर आला होता. आता या चित्रपटाचा धमाकेदार टीजर (CLUB 52 Teaser) प्रदर्शित झाला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हार्दिक जोशीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'क्लब 52' या चित्रपटाचा टीजर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत हार्दिकने कॅप्शनमध्ये 'फक्त पत्त्यांचा नाही, हा खेळ आहे डेरिंगचा... 'क्लब 52' डाव रंगणार १५ डिसेंबरला, तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात' असे लिहिले आहे. या टीजरमध्ये हार्दिकचा खतरनाक लूक पाहायला मिळत आहे.

दमदार स्टारकास्ट असलेल्या 'क्लब 52' या चित्रपटाचा टीजर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. अमित कोळी दिग्दर्शित हा चित्रपट अॅक्शनपॅक्ड असून या चित्रपटामध्ये हार्दिक जोशी धमाकेदार भूमिकेत दिसणार आहे. बजरंग बादशाह यांच्या कथेवर राकेश शिर्के यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे. येत्या १५ डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

'एक डाव नियतीचा' अशी टॅगलाईन 'क्लब 52' या चित्रपटाला देण्यात आली आहे. या चित्रपटाचा टीजर पाहून पत्त्यांचा डाव आणि त्याच्याशी संबंधित कथानक असल्याचा अंदाज लावता येतोय. चित्रपटात हार्दिक जोशीसोबत भाऊ कदम, शशांक शेंडे, भरत ठाकूर, यशश्री व्यंकटेश , टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके हे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या अ‍ॅक्शनपॅक्ड टीजरमुळे कथानकाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT