Hardik Joshi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hardik Joshi's Movie: 'खेळातला माणूस बदलला की खेळाची पद्धतही बदलते...', 'क्लब 52' मधील हार्दिक जोशीच्या लूकनं वेधलं लक्ष

Hardik Joshi's Club 52 Movie: या चित्रपटातील हार्दिक जोशीचा फर्स्ट लूक समोर आला आहे. त्याच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

Priya More

Hardik Joshi' New Movie:

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून राणादाच्या भूमिकेच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहचलेला हार्दिक जोशी सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. हार्दिक लवकरच 'क्लब ५२' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत मुख्य अभिनेत्याच्या रुपाने पदार्पण करणार आहे. हार्दिकच्या 'क्लब ५२' या चित्रपटाचे काही दिवसांपूर्वी पोस्टर रिलीज करण्यात आले होते. आता या चित्रपटातील हार्दिक जोशीचा फर्स्ट लूक समोर आला आहे. त्याच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

हार्दीक जोशीचा आज म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्तच हार्दिकला खास गिफ्ट देण्यात आले आहे. आज हार्दिक जोशीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्याच्या आगामी 'क्लब ५२' या चित्रपटातील लुक सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे. हार्दिकच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हार्दिकचा लूक पाहून त्याचे चाहते चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत आहेत.

नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत 'क्लब ५२' या चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. एक डाव नियतीचा अशी टॅगलाईन असलेल्या 'क्लब ५२' या चित्रपटाच्या पोस्टरवर रावडी-रफटफ लूकमध्ये हार्दिक दिसून येत आहे. एका मोठ्या सोफ्यासारख्या खुर्चीत बसलेला हार्दिक, डोक्यातून वाहणारं रक्त आणि आजुबाजूला उडणारे पत्ते यातून कथानकाविषयीचे सूचक संकेत देण्यात आले आहेत.

हार्दिकने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'क्लब ५२' चित्रपटातील त्याच्या लूकचे पोस्टर शेअर केले आहे. त्याने कॅप्शनमध्ये 'खेळातला माणूस बदलला की खेळाची पद्धतही बदलते...'क्लब ५२' ओपन होत आहे सगळ्यांसाठी...१५ डिसेंबरपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!', असे लिहिले आहे.

हार्दिकचा धमाकेदार लुक असलेल्या या पोस्टरमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता चांगलीच वाढली आहे. अभिनेतीची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच झाल्याने हार्दिकला वाढदिवसाची अनोखी भेट मिळाली असल्याचे सांगितले जात आहे. हार्दिकचा 'क्लब ५२' हा चित्रपट येत्या १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT