Gashmeer Mahajani on Ravindra Mahajani Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gashmeer Mahajani Post: ‘ते स्टार होते त्यांना स्टारच राहू द्या...’ वडिलांच्या निधनानंतर गश्मीर महाजनीची भावुक पोस्ट

Chetan Bodke

Gashmeer Mahajani on Ravindra Mahajani Death: ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वाला धक्का बसला. रविंद्र महाजनी यांचं निधन मावळच्या तळेगाव दाभाडी येथील (Pune News) आंबी गावातील घरी शुक्रवारी (१४ जुलै) सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला.

दोन दिवसानंतर शेजाऱ्यांना वास आला असता त्यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार केली. शेवटी पोलिसांना दार तोडावे लागले. दार तोडल्यावर पोलिसांना रविंद्र महाजनी हे घरात मृतावस्थेत दिसले. अखेर रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनीने सोशल मीडियावर पहिली प्रतिक्रिया दिलीय.

आपल्या वडिलांच्या निधनानिमित्त गश्मीर महाजनी म्हणतो, “ताऱ्याला ताऱ्यासारखंच राहू द्या.. मी आणि माझे कुटुंबीय शांतच राहणं पसंत करतोय. जर माझ्या न बोलण्याने जर मला मानहानी पत्करावी लागत असेल तर इतर कोणत्याही गोष्टीप्रमाणे याचा मी स्वीकार करतो.. वडिलांच्या आत्म्याला शांती लाभो. ओम शांती. ते माझे वडील होते. माझ्या आईचे पती होते. आणि तुमच्या कोणाही पेक्षा आम्ही त्यांना चांगलं ओळखतो. कदाचित योग्य वेळ आली की मी भविष्यात याविषयी बोलेन.”

Gashmeer Mahajani on Ravindra Mahajani Death

तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रणजीत सावंत यांनी सांगितलेल्या पोस्टमार्टम अहवालात ते म्हणतात, शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात रविंद्र महाजनी यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या खुणा देखील नव्हत्या. रविंद्र महाजनींचे निधन गुरूवारी १३ जुलै रोजी झाली असल्याची शक्यता आहे. मात्र अद्याप तरी या प्रकरणाचा व्हिसेरा रोखून ठेवला आहे.

अभिनेते रविंद्र महाजनी यांच्या मृतदेह शुक्रवारी त्यांच्या राहत्या घरी आढळला. शवविच्छेदन अहवालात, त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत. सोबतच त्यांचा मृत्यू गुरूवारी झाली असल्याची शक्यता आहे.

त्यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहे. रविंद्र महाजनी पुण्यातील तळेगाव दाभाडेतील एक्सरबीया सोसायटी, MIDC रोड, आंबी येथे भाड्याच्या घरात राहत होते. त्यांचा मृतदेह त्यांच्या बंद घरात आढळला होता.

रविंद्र महाजनी गेल्या ७- ८ महिन्यांपासून तेथील फ्लॅटवर एकटेच राहत होते. महाजनी यांचे कुटुंबीय त्यांना कोणीही भेटायला येत नसल्याची माहिती शेजारच्यांनी दिली. दरम्यान दोन ते तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT