Happy Birthday Ashok Saraf : अशोक सराफ यांना कलाकार 'मामा' नावाने हाक का मारतात? जाणून घ्या
Happy Birthday Ashok Saraf Saam Tv
मनोरंजन बातम्या

Happy Birthday Ashok Saraf : अशोक सराफ यांना कलाकार 'मामा' नावाने हाक का मारतात? जाणून घ्या

Chetan Bodke

मराठी सिनेसृष्टीतील महानायक म्हणजे अभिनेते अशोक सराफ. गेल्या पाच दशकांपासून अशोक मामांनी मराठी सोबतच हिंदी प्रेक्षकांचेही निखळ मनोरंजन केले. या काळात त्यांनी ३००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज अशोक मामांचा ७७वा वाढदिवस आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या करियरबद्दल जाणून घेऊया...

करियरच्या सुरूवातीला नोकरी सोडून आपल्या प्रोफेशनमध्ये करियर करणारे अनेक सेलिब्रिटी आहेत. त्यापैकी एक म्हणजे, अशोक सराफ, ८० ते ९० च्या दशकात सरकारी नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात अशोक सराफ यांनी करियर केले. ते भारतीय स्टेट बँकेमध्ये नोकरीला होते. आपल्या आई- वडीलांच्या नियमांचे पालन करत ते बँकेत नोकरी करत होते. त्यासोबतच नाटकातही ते काम करत होते. जवळपास १० वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी आपली आवड जोपासली. काम करत असतानाही अभिनयाचे स्वप्न त्यांच्या डोळ्यांत जिवंत राहिले.

मराठीसह बॉलिवूडमध्ये त्यांनी अनेक चित्रपटांत काम केले आहे. नाटक, चित्रपट आणि सिरीयल अशा तिनही क्षेत्रांत काम केले आहे. त्यांनी त्यांच्या फिल्मी कारकिर्दित २५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अशोक सराफ यांना मराठी सिनेसृष्टीमध्ये प्रत्येकजण ‘मामा’ म्हणतो. एका चित्रपटाच्या शूटिंगवेळी प्रकाश शिंदे नावाचा एक कॅमेरामन होता, जो अशोक सराफ यांच्याकडे बोट करून आपल्या मुलीला दाखवत म्हणायचे की, हे बघ तुझे अशोक मामा. तेव्हापासून त्यांना इंडस्ट्रीसह त्यांचा चाहतावर्गही त्यांना मामा म्हणू लागले.

अशोक सराफ यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, अशोक सराफ यांनी त्यांच्यापेक्षा १८ वर्षांनी लहान मुलीशी लग्न केले होते. अशोक सराफ हे त्यांच्या खासगी आयुष्यात खूप चर्चेत होते. १९९० मध्ये अशोक सराफ आणि निवेदिता यांनी लग्नगाठ बांधली. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांना एक मुलगाही आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Updates : अंबादास दानवेंनी व्यक्त केली दिलगिरी, निलंबनाचा फेरविचार करावा यासाठी विनंती

Hatras Stampede Viral Video: हाच तो व्हिडिओ, इथंच झाली चेंगराचेंगरी; हाथरस सत्संगात नेमकं काय आणि कसं घडलं?

Hathras Stampede: सोन्याचं घड्याळ, महागडे चष्मे अन् डिझायनर कपडे; भोले बाबांची रॉयल लाइफस्टाइल

Ashadhi Wari Toll Free : पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी गोड बातमी; राज्य सरकारने घेतला टोलमाफीचा निर्णय

Diabetes Tips : सावधान! मधुमेह असून उपवास करताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT