Actor Aniket Vishwasrao Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aniket Vishwasrao: 'फक्त खोटी आश्वासनं आणि दिशाभूल...', एअलाइन्स कंपन्यांवर संतापला अनिकेत विश्वासराव; नेमकं काय घडलं?

Aniket Vishwasrao Angry At Alliance Companies: अनिकेतसोबत प्रवासादरम्यान नेमकं असा काय उघडलं ज्यामुळे तो इतका चिडला आहे? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

Priya More

Aniket Vishwasrao Instagram Post:

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर जादू करणारा मराठमोळा अभिनेता अनिकेत विश्वासराव (Actor Aniket Vishwasrao) सध्या त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आला आहे. अनिकेत विश्वासरावने या पोस्टच्या माध्यमातून एअरलाइन्स कंपन्यांवर निशाणा साधत राग व्यक्त केला आहे. अनिकेतसोबत प्रवासादरम्यान नेमकं असा काय उघडलं ज्यामुळे तो इतका चिडला आहे? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

काही दिवसांपूर्वी विमान प्रवासादरम्यान अनिकेत विश्वासरावरावची बॅग हरवली. पण एअरलाइन्स कंपन्यांकडून त्याला फक्त आश्वासनं दिली जात आहे. त्याची बॅग अद्याप सापडली नाही. बॅग हरवल्यामुळे त्याला अनेक अडचणी येत आहेत. ही बॅग कधी मिळेल याबाबत तो सतत एअरलाइन्सला विचारणा करत आहे. पण त्याला योग्य उत्तर मिळत नाही. त्यामुळे तो संतप्त झाला आहे. अनिकेतने या एअरलाइन्सविरोधात इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्याच्यासोबत नेमकं काय घडलं हे सांगितले आहे.

अनिकेतने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर विमान प्रवासाच्या तिकिटाचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'प्रिय २ निष्काळजी एअरलाइन्स, माझे चेक इन बॅगेज गेल्या ४ दिवसांपासून गायब आहे. तुमच्या बाजूने एकच प्रतिसाद होता फक्त खोटी आश्वासने आणि दिशाभूल. या ४ दिवसांत तुम्ही माझ्या बॅग ट्रॅक देखील करु शकला नाहीत.फक्त माफीचा ईमेल हा माझ्या समस्येचे निराकरण करणार नाही. तुमच्यातील व्यावसायिकतेच्या अभावामुळे आणि प्रवाशांबद्दलच्या तुमच्यातील सहानुभूतीच्या अभावामुळे मला खूप त्रास होत आहे.'

अनिकेतने या पोस्टमध्ये पुढे असे म्हटले आहे की, 'मला आशा आहे की, ही पोस्ट पाहिल्यानंतर आपण शक्य तितक्या लवकर माझे काम पूर्ण कराल. मी एक प्रोफेशनल अभिनेता आहे. या इंडस्ट्रीत गेल्या २४ वर्षांपासून काम करत आहे. पण मला असा अनुभव कधीच आला नाही. माझे "प्ले कॉस्ट्यूम" मी माझ्यासोबतच्या बॅगेमध्ये घेऊन जातो. पण आता माझ्या कामात अडथळा निर्माण झाला आहे.'

या पोस्टच्या शेवटी अनिकेतने फाईल संदर्भ क्रमांक - EWR98426M टाकला आहे. त्याचसोबत शेवटी तो मला आशा आहे की, भविष्यात अशा समस्येचा सामना कोणालाही करावा लागणार नाही., असं सांगितले आहे. अनिकेलची ही इन्स्टा पोस्ट व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट्स करत त्याला सल्ले देखील दिले आहेत. ही पोस्ट ट्विटवर टाका आणि माध्यमांमध्ये सांगा अशा प्रकारचे सल्ले नेटिझन्स देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT