Aastad Kale On Chhaava Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aastad Kale: 'सोयराबाई राणी सरकार या परपुरुषासमोर बसून पान लावतायत?', 'छावा'मध्ये काम केलेल्या मराठी अभिनेत्याचा आक्षेप

Aastad Kale On Chhaava Movie: मराठमोळा अभिनेता आस्ताद काळेने 'छावा' चित्रपटात काम केले आहे. छावा चित्रपटात त्याने सूर्याची भूमिका साकारली होती. हा चित्रपट रिलीज होऊन २ महिने झाले आता आस्ताद काळेने या चित्रपटाबाबत फेसबुकवर पोस्ट करत अनेक आक्षेप घेतले आहेत.

Priya More

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. विकीचा हा चित्रपट सुपरहिट ठरला. ऐवढच नाही तर या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडले. एकीकडे या चित्रपटाचे सर्वस्तरावरून कौतुक होत असताना या चित्रपटामध्ये काम केलेल्या मराठमोठा अभिनेता आस्ताद काळेने धक्कादायक विधान करत चित्रपटावर आक्षेप घेतला. आस्ताद काळेने फेसबुकवर छावा चित्रपटाबाबत पाच पोस्ट केल्या आहेत. त्याच्या या पोस्ट व्हायरल होत असून आता त्याच्यावर प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत.

छावा चित्रपट रिलीज होऊन २ महिने झाले. तरी देखील प्रेक्षकांनी या चित्रपटाला अजूनही डोक्यावर घेतले आहे. रिलीज झाल्यापासून हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठी गर्दी करत होते. आजही या चित्रपटाची क्रेझ काही कमी झाली नाही. या चित्रपटामध्ये अभिनेता आस्ताद काळेने सूर्या ही भूमिका साकरली आहे. या चित्रपटात काम करून सुद्धा आस्ताद काळेने या चित्रपटावर आक्षेप घेत धक्कादायक वक्तव्य केले आहे. आस्ताद काळेने छावा चित्रपट वाईट असल्याचे म्हणत महाराणी सोयराबाई यांच्याबाबत चित्रेपटामध्ये जी दृश्य दाखवली होती त्यावर आक्षेप घेतला आहे.

Aastad Kale On Chhaava Movie

आस्ताद काळेने महाराणी सोयराबाई यांच्याबाबत चित्रपटामध्ये जी दृष्य दाखवण्यात आली होती त्यावर आक्षेप घेत जी पोस्ट केली आहे त्यामुळे असे लिहिले आहे की, 'हा कुठला इतिहास आहे? महाराणी सोयराबाई सरकारांनी छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाच्या मुलाला पत्र पाठवलं होतं? काय पुरावे आहेत याचे?', असा सवाल विचारला आहे.

आस्ताद काळेने पुढे लिहिले की, 'सोयराबाई राणी सरकारांचे अंत्यसंस्कार एका नदीकाठी? असं नाही व्हायचं हो! सोयराबाई राणी सरकार या परपुरुषासमोर बसून पान लावतायत? आणि ते खातायत? हे कसं चालतं?', असा आक्षेप घेत त्याने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

स्ताद काळेच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर आता जोरदार चर्चा रंगल्या आहेत. नेटकऱ्यांनी त्याच्या या पोस्टवर संताप व्यक्त केला आहे. आस्ताद काळेवरला नेटकऱ्यांनी खडेबोल सुनवायला सुरूवात केली. नेटकऱ्यांचा संताप पाहून अवघ्या काही तासांमध्ये त्याने सर्व पोस्ट डिलीट केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT