The Family Man 4 Saam tv
मनोरंजन बातम्या

The Family Man: श्रीकांत तिवारी इज बॅक; ‘द फॅमिली मॅन’च्या नव्या सीझनबद्दल मनोज वाजपेयींचा मोठा खुलासा

The Family Man: ‘द फॅमिली मॅन 4’बाबत मनोज बाजपेयी यांनी मोठा खुलासा केला आहे. नव्या सीझनमध्ये श्रीकांत तिवारी पुन्हा परतणार असून सर्व प्रश्नांची उत्तर या सीझनमध्ये मिळणार आहेत.

Shruti Vilas Kadam

The Family Man: ओटीटी विश्वात प्रचंड लोकप्रिय ठरलेली 'द फॅमिली मॅन ही वेब सिरीज पुन्हा चर्चेत आली आहे. या सिरिजच्या चौथ्या सीझनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सिरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता मनोज बाजपेयीने स्वतः ‘द फॅमिली मॅन 4’बाबत मोठा खुलासा केला आहे.

अलीकडेच सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधताना मनोज बाजपेयी यांनी सांगितले, चौथा सीझन केवळ येणारच नाही, तर तो आतापर्यंतच्या कथेत उरलेल्या सर्व प्रश्नांची उकल करणार आहे. तो म्हणाला, 'सर्व ॲक्शन आणि सर्व उत्तरं आता चौथ्या सीझनमध्येच मिळतील.' यामुळे त्याच्या स्टेटमेंटमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.

या सिरिजचे दिग्दर्शक राज आणि डीके सध्या सीझन ४च्या तयारीत व्यस्त असून पटकथा लेखन आणि नियोजनाचे काम सुरू आहे. त्यामुळे हा सीझन अधिक भव्य आणि ॲक्शनने भरलेला असेल, अशी चर्चा रंगली आहे. काही नेटकऱ्यांच्या मते, हा सीझन सिरिजचा अंतिम भाग (Finale) असू शकतो, लवकरच याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

द फॅमिली मॅन’चा पहिला सीझन २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये ‘श्रीकांत तिवारी’ हे पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले. एका सामान्य कुटुंबवत्सल व्यक्तीची आणि गुप्तचर एजंटची दुहेरी भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली. दुसऱ्या सीझनमध्ये समंथा रुथ प्रभू हिच्या ‘राजी’ या भूमिकेने मालिकेला जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळवून दिली.

तिसऱ्या सीझनमध्ये कथा आणखी गुंतागुंतीची होती ईशान्य भारत आणि आंतरराष्ट्रीय कटकारस्थानांचा यामध्ये समावेश होता. जयदीप अहलावत आणि निम्रत कौर यांच्या भूमिकांनी कथानकाला वेगळं वळण दिलं. श्रीकांत तिवारीच्या या सिरिजचा चौथा सीझन २०२७ दरम्यान प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात असून, चाहत्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT