Mannara Chopra Father Death SAAMTV
मनोरंजन बातम्या

Mannara Chopra Father Death: मन्नाराच्या डोक्यावरून बापाचे छत्र हरवलं, चोप्रा कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Raman Rai Handa Passed Away : मन्नारा चोप्राचे वडील आणि प्रियांका चोप्राचे काका यांचे निधन झाले आहे. चोप्रा आणि हांडा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Shreya Maskar

मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. लोकप्रिय अभिनेत्री मन्नारा चोप्रा (Mannara Chopra Father Death) हिच्या वडिलांचे निधन झाले आहे. ज्यामुळे चोप्रा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मन्नारा चोप्रा हिचे वडील ॲड. रमण राय हांडा (Raman Rai Handa Passed Away) यांनी वयाच्या 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ॲड. रमण राय हांडा हे सुपरस्टार अभिनेत्री प्रियांका चोप्राचे काका होते.

मन्नारा चोप्राच्या वडिलांचे निधन 16 जून 2025 रोजी सोमवारी झाले. यासंबंधित पोस्ट मन्नारा चोप्राने सोशल मीडियावर शेअर केली आहे. मन्नाराने शेअर केलेल्या पोस्टमध्ये अंत्यसंस्काराचे तपशील पाहायला मिळत आहे. मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे असलेल्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. 18 जून रोजी दुपारी 1 वाजता मन्नारा चोप्राच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मन्नारा चोप्राच्या वडिलांचे जन्म 25 सप्टेंबर 1953 रोजी झाला. आता मन्नारा चोप्राच्या कुटुंबात मन्नारा, तिची बहीण मिताली आणि आई कामिनी हांडा आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रमण राय हांडा गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते.

रमण राय हांडा हे दिल्ली उच्च न्यायालयात वकील होते. रमण राय हांडा आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) यांचे खास नाते आहे. रमण राय हांडा यांचे लग्न कामिनी चोप्रा यांच्यासोबत झाले. कामिनी चोप्रा या प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्राची (Parineeti Chopra)आत्या आहे. याच नात्याने रमण राय हांडा हे प्रियांका चोप्राचे काका होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे एकत्र येण्यावरून 'राजकीय काला'! ठाकरेंच्या नेत्यानं मनोरे रचले; शिंदे- फडणवीसांच्या नेत्यांनी फोडली राजकीय हंडी

1947 Grocery Price: साखर, मीठ, तेल आणि सोनं...१९४७ मध्ये 'या' गोष्टींची किंमत किती होती?

Maharashtra Live Update: अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीला रात्री करा हे ५ उपाय, घरात नांदेल सुख- शांती

मालेगावात मटण-चिकन शॉप बंद, पालिकेच्या आदेशाचं कडेकोट पालन, VIDEO

SCROLL FOR NEXT