Manisha Rani Is Target In The Bigg Boss Ott 2 house Saam TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 2 : मनीषा रानीला टार्गेट केलं जातंय ? 'वीकेंड का वार'नंतर सलमान खानल ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Pooja Dange

Salman Khan Scold Manisha Rani : 'बिग बॉस ओटीटी सीझन 2'चे या वीकेंड का वार हा भाग दमदार झाला आहे. सलमान खानच्या येण्याने बिग बॉसच्या घरातील स्पर्धक खूप आनंदी दिसत होते. दुसरीकडे सलमानने स्पर्धकांची शाळा देखील घेतल्याचे पाहायला मिळालं.

गेल्या वीकेंड का वार या भाग सलमान खानने शो होस्ट केला नव्हता. कॉमेडियन कृष्णा अभिषेकने त्याच्या जागी हा शो होस्ट केला आणि कॉमेडी करून स्पर्धक आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानने पहिल्यांदा जिया शंकरला सुनावले. टास्कदरम्यान जियाने एल्विश यादवला पाण्यात हॅंडवॉश टाकून ते पाणी प्यायला दिले होते. यावरून सलमान खानने जियाची शाळा घेतली. (Latest Entertainment News)

यानंतर जिया शंकरने सलमान खानसमोर केलेल्या कृत्याबद्दल एल्विश यादवची माफी मागितली होती. मात्र स्पर्धकांना हसताना पाहून सलमान खान संतापला.

'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानने मनीषा रानीवर खोटा प्रेमाचा अँगल केल्याबद्दल सुनावले. यादरम्यान, मनीषाशी संवाद साधताना सलमान म्हणाला, 'मनिषाने कोणताही मास्क घातलेला नाही, पण मास्कचे दुकान नक्कीच उघडले आहे.' यादरम्यान सलमान त्याचे सगळ्यांवर लक्ष आहे हे देखील सुचित केले.

लव्ह अँगलबद्दल मनीषा रानी म्हणाली, 'मी खऱ्या आयुष्यातही अशीच आहे आणि सगळ्यांची सेटिंग लावून देते'. यादरम्यान 'इथे गटागटात प्रेम होत आहे, त्यांची सेटिंग लावून दिल्याने तुझा काय फायदा होणार', 'तुझे जे काम आहे ते कर', असे सलमान खान म्हणाला.

सलमान खानवर मनीषाचे चाहते चिडले?

मात्र, 'वीकेंड का वार'मध्‍ये सलमान खानचा मनीषा रानीसोबतचा अ‍ॅटिट्यूड नेटकऱ्यांना आवडला नाही. दरम्यान, मनीषा रानीच्या समर्थनार्थ ट्विटरवर काही हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. लोकांचा असा विश्वास आहे की निर्माते मनीषा रानीला मुद्दामहून टार्गेट करत आहेत.

मनीषा रानीला पाठिंबा देत नेटकऱ्याने लिहिले आहे की, 'जिया आणि फलक मिळून तितका कंटेंट देऊ शकत नाहीत जितका मनीषा एकटी या शोला देते'. तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी निर्मात्यांना प्रश्न केला की, 'मनीषा रानीला टार्गेट का केले जात आहे?'

मात्र, 'वीकेंड का वार'मध्‍ये सलमान खानचा मनीषा रानीसोबतचा अ‍ॅटिट्यूड नेटकऱ्यांना आवडला नाही. दरम्यान, मनीषा रानीच्या समर्थनार्थ ट्विटरवर काही हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. लोकांचा असा विश्वास आहे की निर्माते मनीषा रानीला मुद्दामहून टार्गेट करत आहेत.

मनीषा रानीला पाठिंबा देत नेटकऱ्याने लिहिले आहे की, 'जिया आणि फलक मिळून तितका कंटेंट देऊ शकत नाहीत जितका मनीषा एकटी या शोला देते'. तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी निर्मात्यांना प्रश्न केला की, 'मनीषा रानीला टार्गेट का केले जात आहे?'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT