Mangesh kulkarni Saam tv
मनोरंजन बातम्या

Mangesh kulkarni Death : 'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी काळाच्या पडद्याआड; शाहरुख खानच्या सिनेमाची लिहिली होती स्क्रिट

Mangesh kulkarni Death : 'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन झालं आहे. त्यांनी शाहरुख खानच्या सिनेमाची स्क्रिट लिहिती होती.

Vishal Gangurde

मुंबई : मराठी सिनेसृष्टीवर दुसरा आघात झाला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं. त्यानंतर आता सप्रसिद्ध गीतकार, चित्रपट लेखक आणि अभिनेते मंगेश कुलकर्णी यांचं निधन झालं आहे. मंगेश कुलकर्णी यांनी 'आभाळमाया', 'वादळवाट' यांसारख्या लोकप्रिय मालिकांचे शीषर्कगीत मंगेश कुलकर्णी यांनी लिहिली होते.

गीतकार मंगेश कुलकर्णी यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मंगेश कुलकर्णी यांच्या निधनाने आभाळमाया, वादळवाट यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून शीर्षकगीतातून मनात रुंजी गीतकार हरपल्याची भावना अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.

मंगेश कुलकर्णी यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी लेखन केलं होतं. कुलकर्णी यांनी अनेक मालिकांसाठी शीर्षक गीतेही लिहिली आहेत. प्रहार,'आवारा पागल दिवाना, मुस्तफा, 'येस बॉस' या हिंदी सिनेमांसाठी त्यांनी लेखन केलं होतं.

त्याचबरोबर ते उत्तम लेखक देखील होते. त्याचबरोबर अनेक नाटकातून अभिनेय देखील केला होता. त्यांनी छोट्या पडद्यावर गाजलेल्या 'लाईफलाईन' या मालिकेचे लेखनही केले. कुलकर्णी हे मुंबईच्या पवईत राहायला होते. आज शनिवारी दुपारी कुलकर्णी यांचं निधन झालं.

मंगेश कुलकर्णी यांना वादळवाट, 'आभाळमाया' या मालिकांच्या शीर्षगीतांमुळे लोकप्रियता मिळाली. त्यांच्या या दोन्ही मालिकांच्या शीर्षगीतांनी लोकांच्या मनात घर केलं आहे. त्यांच्या या शीर्षगीतांचे अनेकांनी मोबाईलची रिंगटोन म्हणूनही ठेवल्या होत्या. शीर्षगीतामधील शब्दांमुळे त्यांची गाणी लोकप्रिया झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SBI Jobs: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; महिना ८५००० रुपये पगार; अर्ज कसा करावा?

Maharashtra News Live Updates: शिवसेनेच्या आमदारांचा ताज लँड्स एंडमधील मुक्काम वाढणार

Ram Shinde: पराभव जिव्हारी! राम शिंदे भावुक, पत्रकार परिषदेत रडले; पाहा VIDEO

Swabhimani Shetkari Sanghatana: पुढील 15 दिवसात स्वाभिमानी शेतकरी संघटना छेडणार ऊस दरासाठी आंदोलन

IPL Mega Auction 2025 Live News: आज १०० हून अधिक खेळाडूंचं नशीब चमकणार; कोणावर लागणार कोटींची बोली?

SCROLL FOR NEXT