Mandisa Dies Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mandisa: धक्कादायक! ४७ वर्षीय गायिकेचा मृत्यू; घरात आढळला मृतदेह

Mandisa Dies: आपल्या गाण्यांच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्ध झालेली गायिका मंडिसाचा वयाच्या ४७व्या वर्षी मृत्यू झाला आहे. गायिकेच्या निधनाची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

Chetan Bodke

Mandisa Dies

आपल्या गाण्यांच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्ध झालेली गायिका मंडिसाचा मृत्यू झाला आहे. मंडिसा अमेरिकन आयडॉल सीझन ५ मुळे आणि ग्रॅमी पुरस्काराने जगभरात प्रसिद्ध झाली आहे. मंडिसाच्या निधनाने चाहत्यांसोबत तिच्या परिवारावर आणि मित्रमंडळींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मंडिसाच्या व्हेरिफाईड सोशल मीडिया अकाउंटवरून तिच्या निधनाची दु:खद बातमी देण्यात आली आहे. ४७ वर्षीय मंडिसाचा मृतदेह तिच्या घरात सापडला आहे. त्यानंतर पोलिसांनी तिच्या मृत्यूचा तपास सुरू केला आहे. (Hollywood)

मंडिसाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "आम्ही तुम्हाला माहिती देतो की, काल मंडिसा तिच्या घरी मृतावस्थेत सापडली होती. आम्हाला तिच्या मृत्यूचे कारण माहित नाही. या कठीण काळात तिच्या कुटुंबासाठी आणि जवळच्या मित्र मंडळासाठी तुम्ही प्रार्थना करावी, अशी विनंती आम्ही तुम्हाला करतो. मंडिसा ही जगभरातील आव्हानांचा सामना करणाऱ्या लोकांसाठी प्रोत्साहन आणि सत्याचा आवाज होती." अभिनेत्रीची ही इन्स्टाग्राम पोस्ट शेअर होताच चाहत्यांसह तिच्या सेलिब्रिटी मित्रांनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे. नेमकं अभिनेत्रीने इतकं टोकाचं पाऊल का उचललं ?, याबद्दलचा खुलासा सध्या पोलिस करीत आहे. (Social Media)

मंडिसा लिन हंडली असं मंडिसाचं नाव आहे. तिने २००६ मध्ये अमेरिकन आयडॉल सीझन ५मध्ये सहभाग घेतला होता. या कार्यक्रमामुळे मंडिसाला जगभरात लोकप्रियता मिळाली. अमेरिकन आयडॉल नंतर, २००७ मध्ये मंडिसाचा ट्रू ब्युटी नावाचा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला. मंडिसाला सर्वोत्कृष्ट समकालीन ख्रिश्चन म्युझिक अल्बम श्रेणीतील ग्रॅमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तिला ओव्हरकॉमर अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार देण्यात आला होता. मंडिसाचे 'फ्रीडम', 'इट्स ख्रिसमस', 'व्हॉट इफ वुई रीअल,' 'आउट ऑफ द डार्क' आणि 'ओव्हरकमर' सह अनेक अल्बम रिलीज झालेले आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

Maharashtra Live News Update: उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट

म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांत घर; नाशिकच्या प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार

Devendra Fadnavis: अनंत चतुर्थीदशीला सीएम देवेंद्र फडणवीसांचा जनतेला संदेश; म्हणाले.. |VIDEO

SCROLL FOR NEXT