Priya Bapat  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priya Bapat: तो माझ्यासमोर आला आणि त्याने..., प्रिया बापटने सांगितला तिच्यासोबत घडलेला भयानक प्रसंग

Priya Bapat Video: प्रिया बापटसोबत एक खूपच भयंकर घटना घडली होती. २०१० मध्ये तिच्यासोबत ही घटना घडली होती. शूट संपवून घरी येत असताना प्रिया बापटसोबत एका व्यक्तीने गैरवर्तन केले.

Priya More

Priya Bapat Shared Horrifble Experienced:

मराठी सिनेसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आपल्या सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रिया बापटने फक्त मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीत देखील आपले वेगळं स्थान निर्माण केले आहे. मराठी चित्रपट, नाटक, मालिकांनंतर आता ती बॉलिवूड चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम करताना दिसत आहे. प्रिया बापटने नुकताच एका मुलाखतीमध्ये तिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक प्रसंगाबद्दल सांगितले आहे. आजही तिला ती घटना आठवल्यावर भयंकर राग येतो.

प्रिया बापटसोबत एक खूपच भयंकर घटना घडली होती. २०१० मध्ये तिच्यासोबत ही घटना घडली होती. शूट संपवून घरी येत असताना प्रिया बापटसोबत एका व्यक्तीने गैरवर्तन केले. तिच्या ब्रेस्टला ही व्यक्ती हात लावून गेली. दादरमध्ये ती ज्या परिसरात राहत होती त्याठिकाणीच तिच्यासोबत ही धक्कादायक घटना घडली होती. नुकताच 'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रिया बापटने त्यावेळी नेमकं काय घडलं होतं. त्यानंतर तिची नेमकी काय अवस्था झाली होती हे सांगितले. प्रिया बापटचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

प्रिया बापटने या मुलाखतीमध्ये सांगितले की, 'मी शूट संपवून घरी जात होते. त्यावेळी माझ्या हातामध्ये सामानाच्या पिशव्या होत्या. मी माझ्या फ्रेंडशी फोनवर बोलत होते. त्यावेळी अचानक माझ्यासमोर एक माणून आला आणि त्याने माझ्या ब्रेस्टला हात लावला. मी मागे वळून पाहत नाही तोवर तो माणून तिथून पसार झाला. माझ्यासोबत नेमकं काय घडलं हे समजायला मला दोन-तीन सेकंद लागले. मी तिथेच स्तब्ध उभी होते.

प्रिया बापटने पुढे असे सांगितले की, 'मी मागे वळून पाहिले तर तो माणून तिथे नव्हताच. तो वेगामध्ये पळून गेला. मी घरी आले तेव्हा माझी आई घरी नव्हती. घरामध्ये फक्त बाबाच होते. मी रडत होते. बाबा मला विचारत होते काय झालं. त्यांना नेमकं काय घडलं हे कसं सांगावे हेच मला कळत नव्हते. बाबा मला विचारत होते काय झालं. तर मी त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यांना हे ऐकून खूप वाईट वाटले. ते त्यावेळी खूपच असहाय्य वाटत होते. काय करावे हेच त्यांना कळत नव्हतं.'

तसंच, 'पण त्यावेळी ते अशा गोष्टी होत असतात, हे तुझ्यासोबत घडायला नको होतं, मी त्याला मारेन असं काहीच बोलले नाही. कारण ते त्याला मारणार तरी कसे ना?' या घटनेनंतर तेव्हापासून ते आजपर्यंत जर मला कोणी वाईट नजरेने पाहत आहे असं वाटतं की त्या व्यक्तीने फक्त मला टच करावे. मग मी त्याला पकडेल आणि मारेल असे मला वाटतं. तेव्हापासूनचा राग आजपर्यंत आहे.' , असं देखील तिने सांगितले. प्रियासोबत घडलेला हा प्रसंग ऐकून तिच्या चाहत्यांना देखील वाईट वाटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

Face Care: चेहऱ्याला फ्रेश आणि ग्लोईंग ठेवण्यासाठी घरच्या घरी बनवा 'हा' डी-टॅन फेसपॅक

Shocking : संतापजनक! गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार; मांत्रिकाचं 'अघोरी' कृत्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

Shocking : सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने विहिरीत उडी मारून संपवलं आयुष्य; कोल्हापुरात खळबळ

SCROLL FOR NEXT