Jawan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jawan Advanced Booking : '36 गर्लफ्रेंड्स, 72 एक्स गर्लफ्रेंड्स आणि 80 मित्रांसह 'जवान' पाहणार'; जबरा फॅनला शाहरुखचं भन्नाट उत्तर

Jawan Movie News : जवान सिनेमा अडव्हान्स बुकींगमध्ये नवनवे रेकॉर्ड प्रस्थापित करत आहे.

प्रविण वाकचौरे

Jawan Movie News :

बॉलिवूडच्या बादशहा शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित जवान सिनेमा रिलीज होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून तर चाहत्यांची उत्कंठा आणखी शिगेला पोहोचली आहे. चित्रपटाचा ट्रेलर 31 ऑगस्ट रोजी आला होता. यानंतर एक दिवस अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली. जवान सिनेमा अडव्हान्स बुकींगमध्ये नवनवे रेकॉर्ड प्रस्थापित करत आहे.

सिनेमाच्या रिलीज आधी शाहरुखने चाहत्याशी सोशल मीडियावरुन संवाद साधला. शाहरुखने ट्वीट करत म्हटलं की, ४ दिवस बाकी, त्यानंतर आपण समोरासमोर भेटूयात. तोपर्यंत जवान आणि त्याबद्दल गप्पा मारुयात. त्यानंतर अनेकांनी शाहरुखला बरेच प्रश्न विचारले.

#AskSRK सत्रात एका व्यक्तीने शाहरुखला जे सांगितले त्याची चर्चा आता सोशल मीडियावर सुरु आहे. यूजरने 'जवान'च्या तिकिटांसोबत त्याचा फोटो शेअर केला. त्यात त्याने लिहिलं की, 'त्याने शाहरुख खानच्या चित्रपटासाठी अॅडव्हान्स बुकींग केली आहे. तो त्याच्या 36 गर्लफ्रेंड्स, 72 एक्स गर्लफ्रेंड्स आणि 80 मित्रांसह 'जवान' पाहणार आहे.'

शाहरुखनेही त्याच्या फॅनला मजेशीर उत्तर दिले आहे. शाहरुखने म्हटलं की, 'वाह भाई तेरी जवानी फूट फूट कर चमक रही है. अॅश कर.' (Latest Entertainment News)

अॅटली दिग्दर्शित जवान हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर 31 ऑगस्ट रोजी रिलीज झाला, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 1 सप्टेंबरपासून सिनेमाची बुकिंग सुरू झाले. आतापर्यंत 5 लाखांहून अधिक तिकिटे बुक झाली आहेत.

अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत शाहरुख खानच्याच पठानचा विक्रम जवानने मोडीत काढला आहे. एका अंदाजानुसार बॉक्स ऑफिसवर जवान 85 कोटींहून अधिकची ओपनिंग घेऊ शकतो. चित्रपटा शाहरुखशिवाय नयनतारा, विजय सेतुपती, सुनील ग्रोवर, सान्या मल्होत्रा ​​आणि दीपिका पदुकोण देखील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT