Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: सलमानला किस करत 'मर्डर गर्ल' म्हणाली,'हमारा वो वाला व्हिडीओ..'

Mallika Sherawat : 'बिग बॉस 18'चा पहिला 'वीकेंड का वार' हा चांगलाच गाजला आहे. याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ज्यात अभिनेत्री मल्लिका शेरावत देखील उपस्थित राहिली होती.

Shreya Maskar

सलमान खानचा शो 'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) हा सध्या खूप चर्चेत आहे. या शोमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी खूप तगडे कलाकार आले आहेत. 'बिग बॉस 18'चा पहिला वीकेंडचा वार नुकताच पार पडला आहे. ज्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. घरातील सदस्य सेलिब्रिटींसोबत मज्जा मस्ती करताना पाहायला मिळत आहेत.

बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये खूप खास गोष्टी घडल्या आहेत. बिग बॉसच्या घरात 'वीकेंड का वार' मध्ये भारती, कृष्णा, राजकुमार राव, तृप्ती डिमरी आणि बॉलिवूडची 'मर्डर गर्ल' म्हणजे मल्लिका शेरावत (Mallika Sherawat ) पाहायला मिळाली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मल्लिका शेरावत सलमान खानला बोलते की, 'हम बनाते हैं ना हमारा वो वाला व्हिडीओ' असे बोलून मलायला सलमानला मिठी मारते आणि हळूच गालावर किस देखील करते. यामुळे सलमान थोडा लाजताना दिसत आहे. मल्लिका शेरावतने नॅशनल टीव्हीवर भाईजानला किस केलं आहे.

व्हिडीओमध्ये बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याशी संवाद साधताना दिसत आहे तर भारती आणि कृष्णा देखील फुल कॉमेडी करताना पाहायला मिळत आहेत. भारती आणि अभिषेक यांच्या कॉमेडीमुळे प्रेक्षकांना हसू अनावर होते. बिग बॉसच्या या आठवड्यात कोण नॉमिनेट होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. बिग बॉसच्या घरातून वकील गुणरत्न सदावर्ते यांचा गाढव घराचा निरोप घेणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT