Jeev Majha Guntala saam Tv
मनोरंजन बातम्या

मल्हार-अंतराचं नातं फुलतंय, त्यानं दिली प्रेमाची कबुली; बर्थडे दिल स्पेशल सरप्राईज

सोशल मीडियावर जीव माझा गुंतला मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: स्टार प्रवाहवरील जीव माझा गुंतला (Jeev Majha Guntala)ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. गर्भश्रीमंत, रुबाबदार, हट्टी पण तितकाच हळवा मल्हार आणि दुसरीकडे कष्टकरू, स्वाभिमानी, घर चालवण्यासाठी रिक्षा चालवणारी अंतरा यांच्याभोवती या मालिकेचं कथानक पुढेपुढे सरकत आहे. रिक्षा चालवणाऱ्या अंतरा आणि उद्योजक मल्हार ही जोडी प्रेक्षकांची आवडती झाली आहे. ह्या मालिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. या दोघांच्या जीवनात घडणाऱ्या घटना प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात.

मल्हार आणि अंतरा ह्यांचं लग्न म्हणजे मालिकेतील एक अनोखे वळण होते. ह्या दोघांमध्ये सतत भांडणं होत होती. अंतरा-मल्हार एकमेकांचा द्वेष करायचे, त्यांच्या नात्याचा गुंता कधी सुटेल याची प्रेक्षक वाट बघत होते.

जीव माझा गुंतला ही एक कौटुंबिक मालिका आहे. त्यामुळे ह्या मालिकेतही कटकारस्थान आहेत. अंतरा आणि मल्हारच्या विरोधात चित्र काकी, काका आणि श्वेता मिळून अनेक कट रचत असतात. त्यांच्या आयुष्यात नेहमी नवीन संकटे येत असतात. या संकटातून एकमेकांना आणि कुटुंबाला वाचवताना हे दोघे एकमेकांच्या जवळ आले आहेत. त्यांच्यात अनेक सोनेरी क्षण फुलले आहेत. मल्हारने गिफ्ट्स देऊन अंतराला स्पेशल असल्याची जाणीव सुद्धा करून दिली आहे.

नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. अंतराच्या बर्थडेनिमित्त मल्हार तिला सरप्राईज देत आहे. अंतराकडे मल्हारने प्रेमाची कबुली दिली आहे. यामुळे अंतरा भारावून गेली आहे. पण प्रोमोमध्ये दाखवलेले हे दृश्य सत्य आहे की अंतराचं स्वप्न, हे पाहण्यासाठी आपल्याला नेक्स्ट एपिसोड पाहावा लागेल. अंतरा आणि मल्हारचं नातं कोणतं नवीन वळण घेणार आहे, याची उत्सुकता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhimashankar : पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त भिमाशंकरमध्ये शिवलिंगावर दुग्धाभिषेक आणि महाआरती | VIDEO

Shravan Somwar 2025: पहिल्याच श्रावणी सोमवारी बनलेत 4 दुर्मिळ योग; 3 राशींवर बरसणार पाण्यासारखा पैसा

Office Snacks Recipe : ऑफिसमधल्या छोट्या भुकेसाठी हेल्दी स्नॅक्स, आताच ट्राय करा 'हा' पदार्थ

घराच्या कोपऱ्यात लपलेला तब्बल १२ फूट अजगर; व्हिडिओ पाहून शहारे येतील

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

SCROLL FOR NEXT