Achani Ravi Passes Away Twitter
मनोरंजन बातम्या

Ravindranath Nair Passes Away: प्रसिद्ध निर्माता आणि उद्योगपतीचं निधन, निधनानंतर टॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा

Ravindranath Nair Dies: सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि प्रसिद्ध उद्योगपती रवींद्रनाथ नायर यांचं निधन झाले आहे.

Chetan Bodke

Achani Ravi Passes Away: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी येत आहे. सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि प्रसिद्ध उद्योगपती अचानी रवी उर्फ रवींद्रनाथ नायर (Ravindranath Nair) यांचं निधन झाले आहे. अचानी रवी (Achani Ravi) यांचे शनिवारी (८ जुलै) रोजी निधन झाले. निर्मात्यांनी केरळमधील कोल्लममध्ये वयाच्या ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या सिने कारकिर्दीची सुरुवात ‘अन्वेशिचू कंदेठीला’ या चित्रपटातून झाली असून त्यांनी आतापर्यंत टॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. (Tollywood Actor)

अचानी रवी यांच्या पश्चात त्यांची २ मुलं आणि १ मुलगी आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, अचानी रवी यांची पत्नी उषा राणीचे २०१३ मध्ये निधन झाले. त्या एक प्रसिद्ध गायिका होत्या. अचानी रवी यांची सिनेसृष्टीत निर्माता म्हणून आपली कारकीर्द सुरू झाल्यानंतर १९७० ते १९८० च्या दशकात जनरल पिक्चर्सच्या बॅनरखाली मल्याळम चित्रपटांची निर्मिती केली. रवींद्रनाथ नायर यांना १९७३ मध्ये अचनी या चित्रपटानंतर अचनी रवी हे टोपण नाव पडलं. (Tollywood)

अचनी रवी यांनी निर्मित केलेला ‘थंपू’ हा चित्रपट २०२२ मध्ये पार पडलेल्या ‘कान्स चित्रपट महोत्सव’मध्ये प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट दिवंगत चित्रपट निर्माते जी. अरविंदन यांनी दिग्दर्शित केला होता.

कांचना सीता, थंपू, कुम्मट्टी, एस्तप्पन, पोक्कुवेइल, एलीप्पथायम, मंजू, मुखमुखम, अनंतराम आणि विधेयान या चित्रपटांची अचनी रवी यांनी निर्मिती यांनी केली. अचनी रवी यांना आपल्या सिने कारकीर्दीत एकूण २० चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टॉलिवूडमधील अमूल्य योगदानासाठी अचनी रवी यांना ‘जेसी डॅनियल पुरस्कार’ आणि ‘केरळ राज्य चित्रपट पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले.

अचनी रवी यांचा जन्म केरळमधील कोल्लममध्ये एक श्रीमंत व्यापारी कुटुंबात झाला. त्यांनी आपल्या वडिलांचा काजू व्यवसाय सांभाळला. त्यांचा विजयलक्ष्मी काजू हा केरळमधील उत्कृष्ट आणि उच्च दर्जाचा काजू उद्योग म्हणून ओळखला जातो. निर्माता आणि व्यावसायिक असण्यासोबतच त्यांची सामाजिक कार्यकर्ता म्हणून देखील ओळख होती. अचानी रवी यांच्या निधनानं मल्याळम चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT