Baiju Paravoor Saam TV
मनोरंजन बातम्या

Famous Director Death : पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच घेतला अखेरचा श्वास ; प्रसिद्ध दिग्दर्शकाचे वयाचे ४२ व्या वर्षी निधन

South Director Death : मल्याळम चित्रपट दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन कंट्रोलर बैजू परवूर यांचे निधन झाले आहे.

Pooja Dange

Malayalam director Baiju Paravoor passes away : मल्याळम चित्रपट दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन कंट्रोलर बैजू परवूर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ताप आणि शारीरिक त्रासामुळे बैजू यांच्यावर उपचार सुरू होते.

दिग्दर्शकाच्या अकाली निधनामागचे मुख्य कारण अन्नातून विषबाधा झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. वृत्तानुसार, बैजूच्या कुटुंबीयांनी असा दावा केला आहे की अन्नातून विषबाधा झाल्यामुळे त्यांना शारीरिक त्रास होत होता, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. (Latest Entertainment News)

शनिवार, 24 जून रोजी बैजू परवूर एका चित्रपटाच्या कामासाठी कोझिकोडमध्ये होते आणि नंतर घरी परतत असताना हॉटेलमध्ये जेवण केले. शारीरिक अस्वस्थता असल्याने त्यांनी कुन्नमकुलम येथे पत्नीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला, जिथे त्याची प्रकृती आणखीनच बिघडली. त्यानंतर रविवारी त्यांना कुळुपिल्ली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

बैजूची प्रकृती बिघडल्याने त्यांना कोची येथील रुग्णालयात नेण्यात आले. सोमवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी चित्रा आणि त्यांची मुले आराध्या आणि आरव असा परिवार आहे. सोमवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बैजू यांच्या आकस्मिक निधनामुळे इंडस्ट्रीत शोकाचे वातावरण आहे. (Celebrity)

बैजू परवूर यांचा आगामी चित्रपट 'सिक्रेट' लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार होता आणि ही घटना घडली. बैजू यांचा दिग्दर्शित पहिला चित्रपट 'सिक्रेट' पुढील महिन्यात जुलैमध्ये रिलीज होणार आहे. दिग्दर्शक असण्यासोबतच बैजू परवूर यांनी ४५ हून अधिक चित्रपटांमध्ये प्रॉडक्शन कंट्रोलर म्हणूनही काम केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT