Kochu Preman Saam TV
मनोरंजन बातम्या

Kochu Preman:मल्याळम विनोदी अभिनेते कोचु प्रेमन यांचे निधन; वयाच्या ६८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला

प्रसिद्ध अभिनेते कोचु प्रेमन यांचे शनिवारी (३ डिसेंबर) रोजी निधन झाले.

साम टिव्ही ब्युरो

Kochu Preman: मल्याळम सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेते कोचु प्रेमन यांचे शनिवारी (३ डिसेंबर) रोजी निधन झाले. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मल्याळम सिनेसृष्टीत त्यांनी छोट्या पडद्यावर दमदार कामगिरी केली. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. (latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून कोचु प्रेमन यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे एका खाजगी रुग्णालयात (Hospital) त्यांच्यावर उपचार सुरु होते. प्रकृतीशी झुंज देत असताना शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत त्यांनी सुरुवातीला अनेक नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर अनेक विनोदी भूमिकेत त्यांनी छोटा पडदा गाजवला. त्यांच्या निधनाने केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सोशल मीडिया मार्फत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कोचु प्रेमन यांनी रुपेरी पडद्यावर देखील मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी २५० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. यात साल १९९७ रोजी प्रदर्शित झालेला 'गुरु' या चित्रपटाने (Movie) त्यांना विशेष पसंती मिळवून दिली. त्यानंतर थेनकसीपट्टणम, लीला, पप्पी अप्पाचा असे अनेक सुपरहीट चित्रपट त्यांनी या सिनेसृष्टीला दिले आहेत. ओरु पप्पडवदा प्रेमम हा त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TET : राज्यातील लाखो शिक्षकांचा पगार अडकणार, वेतन अधीक्षकांचे शाळांना महत्वाचे आदेश; ‘टीईटी’ संदर्भातील नवीन अपडेट काय?

Namo Shetkari Yojana: ‘नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता; राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात

Malegaon Blast Case: NIA कोर्टचा आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका, साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहितांची अडचण वाढणार?

एका दिवसात किती सब्जा खावा? जाणून घ्या

Aloe Vera: कोरफडीचे जेल रात्रभर चेहऱ्यावर लावल्याने कोणते फायदे होतात?

SCROLL FOR NEXT