Malaika Arora  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Video: बॉयफ्रेंडच्या आठवणीत मलायकाचा 'गोरी है कलाइयां'वर जबरा डान्स, व्हिडीओ व्हायरल

मलायकाने तिचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड फॅशनिस्टा आणि फिटनेस क्वीन मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या लूक आणि स्टाइलमुळे (Bollywood) चंदेरी दुनियेत नेहमीच चर्चेत असते. मलायका वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते. मलायकाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. दरम्यान, सोशल मीडियावर मलायकाची एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.नुकताच मलायकाने तिचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका बांगड्या घालून अभिनेत्री सोफी चौधरीसोबत 'गोरी है कलाइयां' या गाण्यावर नाचताना दिसत आहे.

मलायका अरोराने नुकताच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. गायिका, मॉडेल आणि अभिनेत्री सोफी चौधरीच्या 'गोरी है कलाइयां' या गाण्यावर मलायका अरोरा आणि सोफी चौधरीने डान्स करत एक व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये मलायकाने ऑफ-व्हाइट क्रॉप टॉप आणि ब्लू डेनिम परिधान केले आहे. तर, सोफीने ऑरेंज ट्यूब टॉपसह ब्लू डेनिम असा लूक केला आहे. दोघेही एकत्र सोफीच्या 'गोरी है कलाईयां' या नवीन रिमेक गाण्यावर हुक स्टेप डान्स करताना दिसत आहेत.

मलायका आणि सोफीचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यापासून तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओ पोस्टवर मलायकाच्या चाहत्यांसोबतच तिचे बी-टाऊनमधील मित्रही प्रतिक्रिया करत तिचे कौतुक करत आहेत.

सोफी चौधरी अनेकदा जुन्या हिट गाण्यांचे रिमिक्स बनवते. अलीकडेच तिच्या 'गोरी है कलाइयां' या गाण्याच्या लॉन्च इव्हेंटमध्ये ती जुन्या गाण्यांचे रिमिक्स का बनवते ? याचे कारण सांगितले. खरं तर, सोफीला असं वाटतं की, लोकांना आजच्या काळातील गाणी फार काळ लक्षात राहत नाहीत. पण जुन्या गाण्यांमध्ये इमोशनस् असतात. त्यामुळे आजही लोक जुनी गाणी गुणगुणतात. सोफी जुन्या गाण्यांना नवा टच देऊन त्यांचे रिमेक बनवते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : हे पदार्थ खाल्ल्याने ७ दिवसातच चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो

वारी म्हणजे काय? महाराष्ट्रात वारी कधीपासून सुरू झाली?| Pandharpur Wari 2026

Kidney Health: किडनी अटॅकचा धोका टाळायचाय? लगेचच आहारात घ्या या ७ गोष्टींचा समावेश

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

हॉटेल स्टाईल व्हेज मंचाव सूप घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT