Arjun Kapoor and Malaika Arora Photos Saam Tv
मनोरंजन बातम्या

पॅरिसमध्ये अर्जून कपूरच्या बर्थडेचं खास सेलिब्रेशन, गर्लफ्रेंड मलायकासोबत करणार पार्टी

अर्जुनला ७२ तासांपूर्वी अनेक खास भेटवस्तू देऊन तिच्या प्रेमाची जाणीव करून दिली आहे. या भेटवस्तूचा फोटो अर्जुन कपूरने इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर(Arjun Kapoor) २६ जून रोजी त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करणार आहे. अशात बॉलिवूडपासून सोशल मीडियावर त्याच्या वाढदिवसाची जोरदार चर्चा रंगली आहे. प्रत्येक वेळी प्रमाणेयाही वेळी अर्जुन कपूर त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरासोबत(Malaika Arora) मुंबईपासून दूर पॅरिसमध्ये आपला एकत्र वाढदिवस साजरा करणार आहेत. दरम्यान, हे कपल मुंबई विमानतळावर एकत्र दिसले. त्याचबरोबर मलायका देखील तिच्या बॉयफ्रेंडवर प्रेम व्यक्त करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. म्हणूनच तिने अर्जुनला ७२ तासांपूर्वी अनेक खास भेटवस्तू देऊन तिच्या प्रेमाची जाणीव करून दिली आहे. या भेटवस्तूचा फोटो अर्जुन कपूरने इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

काल रात्री अर्जुन आणि मलायका मुंबई विमानतळावर एकत्र दिसले. मुंबई विमानतळावरून या कपलचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहे. ज्यामध्ये मलायका काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेस आणि काळ्या बुटांमध्ये एअरपोर्ट लूकमध्ये होती. तर अर्जुन कपूरच्या एअरपोर्ट लूकबद्दल बोलायचे झाले तर तो निळा टी-शर्ट, काळी जीन्स आणि काळ्या लेदर जॅकेटमध्ये होता.

मलायकाने दिले अर्जुनला अॅडवान्स् बर्थडे गिफ्ट्स...

अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की, मलायकाने त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक बर्थडे गिफ्ट्स आधीच पाठवले आहेत. यासोबतच त्याने गिफ्टचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये काळ्या आणि पांढऱ्या स्ट्राइप रॅपरमध्ये पॅक केलेला बॉक्स दिसत आहे. हे शेअर करत अर्जुनने लिहिले की, '७२ तासांपूर्वी तिने मला आठवण करून दिले की हा माझ्या वाढदिवसाचा आठवडा आहे.' यासोबतच अर्जुनने मलाइकाला टॅगही केले.

चाहते या कपलच्या लग्नाची वाट पाहत आहेत...

मलायका आणि अर्जुन बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे दोन्ही कलाकार ४ वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत. दोघेही अनेकदा बॉलिवूड पार्टी, डिनर आणि इतर कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात. त्यांच्या नात्याची चर्चा रोजच होत असते. चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. माहितीनुसार, अर्जुन आणि मलायका यावर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात लग्न करू शकतात. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT