रणबीर म्हणाला, आलिया माझ्यासाठी दाल-तडका आणि लोणच्यासारखी!

नुकतेच त्यानं प्रसारमाध्यमांसमोर येऊन आलियासोबत लग्नानंतरचं आयुष्य आणि तिच्याबद्दल भरभरून बोलला आहे. आलिया माझ्यासाठी दाल-तडका आणि सोबत लोणच्यासारखी आहे.
Ranbir Kapoor and Alia Bhatt Image
Ranbir Kapoor and Alia Bhatt ImageSaam Tv
Published On: 

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट(Alia Bhatt) हे सध्याचं बॉलिवूडमधलं सर्वात चर्चेतलं कपल. नुकतंच या दोघांचं लग्न झालं. दोघेही सध्या त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यग्र आहेत. आलिया लंडनमध्ये तिचा पहिला हॉलिवूड चित्रपट 'द हार्ट ऑफ स्टोन'चे चित्रीकरण करत आहे. रणबीर त्याच्या आगामी दोन मोठ्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे.

Ranbir Kapoor and Alia Bhatt Image
शमशेराचा ट्रेलर लॉन्च होण्यापूर्वी रणबीर कपूरचा अपघात

या दोघांच्या लग्नाला दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. रणबीर आणि सून आलियाबद्दल नीतू सिंग अनेकदा पत्रकारांसमोर भरभरून बोलल्या आहेत. पण रणबीरने त्याच्या वैवाहिक जीवनाबद्दल अद्याप काहीही सांगितले नव्हते. पण नुकतेच त्यानं प्रसारमाध्यमांसमोर येऊन आलियासोबत लग्नानंतरचं आयुष्य आणि तिच्याबद्दल भरभरून बोलला आहे.

रणबीर कपूरच्या 'शमशेरा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मात्र ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना त्याने पहिल्यांदाच पत्नी आलिया भट्टसोबतच्या वैवाहिक जीवनाविषयीच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

Ranbir Kapoor and Alia Bhatt Image
Shamshera New Poster: कपाळावर टिळा, हातात चाबूक...संजय दत्तचा इतका भयंकर अवतार कधी पाहिलाय का?

रणबीरचे दोन मोठे चित्रपट ४५ दिवसांच्या अंतराने होणार रीलीज...

रणबीर म्हणाला की, 'माझे दोन सिनेमे 'शमशेरा' आणि 'ब्रह्मास्त्र' ४५ दिवसांच्या कालावधीत रिलीज होणार आहेत. माझे हे नशीब आहेत की आणखी काही हे मला सांगता येणार नाही. कारण हे दोन्ही चित्रपट अवघ्या ४५ दिवसांच्या अंतराने प्रदर्शित होत आहेत'.

माझ्यासाठी आलियापेक्षा चांगला जोडीदार कोणी नाही...

रणबीर कपूर पुढे म्हणाला की, 'चित्रपटांव्यतिरिक्त, हे माझ्यासाठी खूप मोठे वर्ष आहे. कारण याच वर्षी माझं लग्नही झालं आहे. आयुष्यात डाळ-भात नको, कबाब पाहिजे असे मी नेहमी म्हणायचो. पण मी माझ्या आतापर्यंतच्या अनुभवाने सांगू शकतो की डाळ-भातापेक्षा चांगले काहीही नाही. आलिया माझ्यासाठी दाल-तडका आणि सोबत लोणच्यासारखी आहे. मला कधीच तिच्या एवढी चांगली जोडीदार भेटली नसती'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com