Malaika Arora Image Saam Tv
मनोरंजन बातम्या

फिटनेस क्वीन मलायकानं बाथरूममधून बाहेर येताना केली मोठी चूक, नेमकं काय घडलं?

तिने बाथरूममधून बाहेर येताना केलेल्या तिच्या चुकीची कबुली दिली होती. मलायका अरोराकडून नक्की काय चूक झाली, ज्याबद्दल तिने स्वतः सोशल मीडियावर येऊन चाहत्यांना सांगितले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि फिटनेस क्वीन मलायका अरोरा(Malaika Arora) सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच सुंदर आणि मजेशीर क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. मलायका सध्या बॉयफ्रेंड अर्जुन (Arjun Kapoor) कपूरसोबत पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. अर्जुन कपूरच्या वाढदिवसानिमित्त हे दोघेही तिथे पोहोचले आणि सोशल मीडियावर चाहत्यांसोबत प्रत्येक क्षण शेअर करत आहेत. मलायकाने स्वत: गेल्या वर्षी अशीच एक घटना शेअर केली होती, ज्यामध्ये तिने बाथरूममधून बाहेर येताना केलेल्या तिच्या चुकीची कबुली दिली होती.

मलायका अरोराकडून नक्की काय चूक झाली, ज्याबद्दल तिने स्वतः सोशल मीडियावरून चाहत्यांना सांगितले. आपल्या फिटनेस आणि बोल्डनेसमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री मलायका अरोरा कोरोना काळात इतकी घाबरली होती की एकदा बाथरूममधून बाहेर येताना पॅण्ट घालायलाच विसरली होती.

ही गोष्ट त्या दिवसांची आहे, जेव्हा कोरोना महामारीमुळं लोक खूप घाबरले होते. चेहऱ्यावर मास्क लावणे, वारंवार हात धुणे अशी काळजी त्या काळात सर्व जण घेत होते. मलायकाने इन्स्टा स्टोरीजवर याच कोरोना काळातील किस्सा शेअर केला.'कोरोनाच्या आधी जेव्हा माझ्या घरी पाहुणे यायचे तेव्हा मी त्यांना म्हणायचे की घाबरू नका. मी माझ्या कुत्र्याला लस दिली आहे. आता मी त्यांना सांगते की घाबरू नका, आपण लस घेतली आहे'.

मलायकाने इन्स्टा स्टोरीजवर तिचा अजून एक किस्सा शेअर करताना लिहिले की, 'मी एका रेस्टॉरंटच्या बाथरुममध्ये गेले होते. म्हणून मी घाबरून माझ्या हाताच्या कोपराने दरवाजा उघडला. मी टॉयलेट सीट पायानेच वर केली. मी माझे हात धुतले आणि नंतर माझ्या हाताच्या कोपराने बाथरूमचे दार बंद केले. पण जेव्हा मी टेबलवर आले, तेव्हा मला कळले की मी माझी पॅण्ट घालायला विसरले आहे.'

दरम्यान, मलायका अरोरा आपल्या फिटनेस आणि फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. ती स्वतःला मेन्टेन ठेवण्यासाठी नेहमी वर्कआउट करते. मलायकाचे जीमबाहेरचे फोटो अनेकदा व्हायरल होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Potato Bhaji Recipe: कुरकुरीत कांदा- बटाटा भजी कशी बनवायची?

Bajaj Pulsar 220Fची शानदार वापसी; अधिक सुरक्षितेसह धमाकेदार फीचर्स, अर्जंट ब्रेक मारला तरी बाईक राहील अंडर कंट्रोल

Medu Vada : नाश्त्याला ब्रेड बटर सोडा, बनवा झटपट ब्रेडचे कुरकुरीत मेदूवडे, संध्याकाळ होईल झक्कास

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरण; औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला वाल्मीक कराडचा जामीन अर्ज

तिलक वर्माची ICC Ranking मध्ये मोठी झेप; पाकिस्तानी फलंदाजाला टॉप ५ मधून बाहेर फेकलं

SCROLL FOR NEXT