Malaika Arora SAAM TV
मनोरंजन बातम्या

Malaika Arora : "कुणाचा अनादर करण्यापेक्षा...", अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायकाची Cryptic पोस्ट चर्चेत

Malaika Arora cryptic post : अलिकडेच मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचा ब्रेकअप झाला आहे. अशात आता मलायका अरोरा एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये नेमकं काय आहे, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोरा (Malaika Arora) कायम तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत असते. अलिकडेच तिचा आणि बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा ब्रेकअप झाला आहे. त्याचे खूप वर्षांचे नाते संपले आहे. अशात आता मलायका अरोराने सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मलायकाने इन्स्टाग्राम एक स्टोरी पोस्ट केली आहे.

मलायकाची स्टोरी

"तुम्ही जितके मोठे व्हाल तितके संघर्षात/ अडचणीत शांतता आणि अनादरापेक्षा अंतर निवडता. ड्रामा तुमच्यासाठी असहिष्णू बनते आणि तुमची शांतता ही तुमची प्रायोरिटी बनते. तुम्ही आजूबाजूला असलेल्या चांगल्या लोकांसोबत वावरता. जे तुमचे मानसिक आरोग्य, हृदय आणि आत्म्यासाठी उत्तम असते. "

2024 मध्ये दिवाळीतच अर्जुन कपूरने मलायका अरोरासोबत ब्रेकअप झाल्याचे सांगितले होते. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर 2018 पासून एकत्र होते. अरबाजसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यांनी तब्बल सहा वर्ष एकमेकांना डेट केले आणि आता ते वेगळे झाले आहेत.

Malaika Arora

बॉलिवूडमध्ये अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा कायमच त्यांच्या नात्यामुळे चर्चेत राहिले. अर्जुन कपूर हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. त्यामुळे त्यांना अनेकदा ट्रोल करण्यात आले. सध्या अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा दोघे सुद्धा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये व्यस्त आहेत आणि आपल्या करिअरकडे लक्ष देताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: पुणे हादरले! कॉलेजबाहेर विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Lek Ladki Yojana: राज्य सरकारची योजना! लेक १८ वर्षांची झाल्यावर मिळणार १ लाख १ हजार रुपये

Sambhajinagar Tourism : संभाजीनगरजवळील ऐतिहासिक अन् सांस्कृतिक खजिना, लहान मुलांसोबत पिकनिकला उत्तम ठिकाण

Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, गॅस सिलिंडरच्या टाकीने ठेचून हत्या, कारण वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT