Malaika Arora SAAM TV
मनोरंजन बातम्या

Malaika Arora : मलायका अरोरा झाली मालामाल; विकलं मुंबईतील आलिशान अपार्टमेंट, नफा वाचून बसेल धक्का

Malaika Arora Sells Apartment : बॉलिवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोराने मुंबईतील आलिशान अपार्टमेंट विकले आहे. किती कोटींचा व्यवहार झाला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

मलायका अरोराने मुंबईतील आलिशान अपार्टमेंट विकले आहे.

मुंबईत अंधेरी येथे मलायकाचे घर होते.

मलायकाने कोट्यवधींना घर विकले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. आता मात्र मलायका एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. मलायका अरोराने मुंबईतील आपले आलिशान अपार्टमेंट विकले आहे. मलायकाने मुंबईतील अंधेरी पश्चिम आलिशान अपार्टमेंट विकून कोट्यवधींचा नफा मिळवला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मलायका अरोराने अंधेरी येथील घर 5.3 कोटी रुपयांना विकले आहे. ऑगस्टमध्ये हा व्यवहार करण्यात आला आहे. अपार्टमेंट विकून मलायका अरोराला तब्बल 2.04 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. मलायकाने 2018 मध्ये 3.26 कोटी रुपयांना ही मालमत्ता खरेदी केली होती. मलायकाची अंधेरीमधील ही मालमत्ता लोखंडवाला येथे होती. अपार्टमेंटचा कार्पेट एरिया 1,369 चौरस फूट आणि बिल्ट-अप एरिया 1,643 चौरस फूट आहे. अपार्टमेंटला कार पार्किंग देखील आहे.

अपार्टमेंटची स्टॅम्प ड्युटी 31.8 लाख रुपये आणि नोंदणी फी 30,000 इतकी होती. लोखंडवाला हा लग्जरी एरिया आहे. येथे आलिशान अपार्टमेंट्स आहेत. तसेच अनेक सेलिब्रिटींची घरे देखील आहेत. मलायका अरोरा एक लग्जरी लाइफस्टाइल जगते. मीडिया रिपोर्टनुसार, मलायका अरोराची एकूण संपत्ती जवळपास 98–100 कोटी रुपये आहे.

वर्कफ्रंट

मलायका अरोरा तिच्या फॅशन, फिटनेस आणि डान्ससाठी ओळखली जाते. तसेच मलायका मॉडेलिंग देखील करते. ती डान्स रिअॅलिटी शोची जज देखील आहे. मलायका अरोराच्या आगामी प्रोजेक्टची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. मलायका अरोरा लवकरच 'थामा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT