Malaika Arora Father Death SAAM TV
मनोरंजन बातम्या

Malaika Arora Father Death : ते माझे फ्रेंड होते, वडिलांच्या निधनानंतर मलायकाची भावनिक पोस्ट

Malaika Arora Father Death Post : वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री आणि फिटनेस क्लीन मलायका अरोरा (Malaika Arora ) हिच्या वडिलांन काल 11 सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. मलायकाच्या वडिलांनी सकाळी साडे नऊच्या सुमारास आयसा मॅनॉर इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Suicide ) केली. अनिल अरोरा असे तिच्या सावत्र वडिलांचे नाव होते. वडिलांचे निधनानंतर मलायकावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच संपूर्ण बॉलिवूड शोककळा पसरली आहे. वडिलांच्या आत्महत्येने मलायका आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराने पहिलीच पोस्ट सोशल मीडियावर (Social Media Post) केली आहे. ही पोस्ट वाचून काळजाचा ठोका चुकतो. एवढी भावनिक पोस्ट तिने लिहिली आहे. मलायका भावनिक पोस्ट करत लिहिते की, मला सांगायला दुःख होते की, माझे वडील अनिल मेहता (Anil Mehta) आता या जगात नाहीत. ते माझे बेस्ट फ्रेंड होते. तसेच ते एक चांगले वडील आणि एक चांगला माणूस होते. वडिलांना गमावल्यामुळे आमचे कुटुंब दु:खात आहे. त्यामुळे आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा अशी विनंती मी मीडिया आणि शुभचिंतकांना करते. या कठीण काळात आम्हाला सहाय्य करा. तुमच्या पाठिंब्यासाठी खूप आभार.'

मलायकाच्या वडिलांनी आत्महत्यापूर्वी दोन्ही मुलींसोबत संवाद साधला होता. त्यांनी आपल्या मुलींना मी खूप थकलो आहे असे म्हटलं होत. मलायकाचे वडील हे हिंदू पंजाबी असून मर्चंट नेव्हीत कामाला होते. मलायका 11 वर्षांची असताना आई-वडील विभक्त झाले.

मलायकाच्या वडिलांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण बॉलिवूड तिच्या घरी धावला. अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली. दु:खाच्या काळात मोठ्या संख्येने पापाराझींना घराबाहेर पाहून वरुण धवन चांगलाच संतापला होता. त्यांने सोशल मीडियावर पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी लिहिले की,'शोक करणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर कॅमेरे लावणे ही सर्वात असंवेदनशील गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही जे वागता त्याचा दुसऱ्याला त्रास होतो याचा विचार करा. काम असले तरी माणुसकी महत्त्वाची आहे. अशा पद्धतीने वरुण व्यक्त झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

Monday Horoscope: पैशाची तंगी होईल दूर, ४ राशींना करावा लागेल खूप प्रवास, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update : कोल्हापूर महानगर पालिका निवडणूक, जनसुराज्य शक्ती – आरपीआय – पीआरपी यांचा ‘सुराज्य संकल्प’ जाहीरनामा जाहीर

आदित्य ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांची नक्कल, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT