Malaika Arora and Arjun Kapoor Image  Saam Tv
मनोरंजन बातम्या

मुंबईत पाऊस अन् मलायकाचा अर्जुनवर प्रेमवर्षाव; पाहा पॅरिस ट्रिपची रोमँटिक झलक

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर फॅशन कॅपिटल पॅरिसमध्ये होते आणि तिथे दोघांनी अर्जुनचा वाढदिवस साजरा केला. या कपलने त्यांच्या व्हेकेशनची झलक इंस्टाग्रामवर लोकांमध्ये शेअर केली, जी प्रचंड व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : फिटनेस क्वीन मलायका अरोरा (Malaika Arora) आणि बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हे दोघे काही दिवसांपूर्वी पॅरिसला गेले होते. त्यांचे पॅरिस ट्रिपचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. आता हे दोघेही मुंबईत आले आहेत. मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळं इथलं वातावरण रोमँटिक झालं आहे. मुंबईचा पाऊस आणि या रोमँटिक वातावरणात मलायकानंही तिचा आणि अर्जुनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अर्जुनसोबतचे रोमँटिक क्षण या व्हिडिओमध्ये आहेत. पॅरिस व्हेकेशनचे काही क्षण या व्हिडिओत आहेत. यात अर्जुन आणि मलायका सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे फॅशन कॅपिटल पॅरिसमध्ये होते. तिथे अर्जुनच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. अर्जुनच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलकही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. मलायका ही अर्जुनला तिच्या हाताने केक भरवताना दिसत आहे. रेस्टॉरंटचे कर्मचारी आणि पाहुण्यांनी अर्जुन कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

व्हिडिओमध्ये मलायकाने तिचे फूड लव्हही दाखवले आहे. यामध्ये अर्जुन आणि मलायका विविध प्रकारचे इटालियन पदार्थ खाताना दिसत आहेत. या ट्रिपमध्ये दोघांमधील नातं किती घट्ट झालंय, हे पाहायला मिळत आहे. अर्जुन आणि मलायका यांनी पॅरिसमधील आयफेल टॉवरही पहिल्याची झलक व्हिडिओमध्येही दिसते

रोमँटिक वातावरणत शेअर केला थ्रोबॅक व्हिडिओ

हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यापासून खूप वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना 'ये मौसम कितना रोमांटिक है… #थ्रोबैक तो बनता है… असे मलायकाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनीही कमेंटचा पाऊस पाडला आहे. या रोमँटिक कपलवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्याचबरोबर हे कपल कायम असेच एकत्र राहो, अशी प्रार्थना अनेकांनी कमेंटद्वारे केली आहे.

मलायका आणि अर्जुन मुंबईत परत आल्यापासून आपापल्या कामात व्यग्र झाले आहेत. अर्जुनच्या 'एक विलेन रिटर्न्स' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अर्जुनसोबत तारा सुतारिया, जॉन अब्राहम आणि दिशा पाटनी महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. मोहित सुरीने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट याच महिन्यात २९ तारखेला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: विरोधकांनी 'त्या' विषयाचा बाऊ केला, गुलाबराव पाटील असं का म्हणाले? VIDEO

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

SCROLL FOR NEXT