mahima chaudhary mother Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mahima Chaudhary Mother Passes Away: महिमा चौधरीवर कोसळला दुःखाचा डोंगर; अभिनेत्रीचं मातृछत्र हरपलं

Mahima Chaudhary: महिमा चौधरीच्या आईनेही या जगाचा निरोप घेतला आहे.

Pooja Dange

Actress Mahima Chaudhary Mother Died: बॉलिवूड कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांच्या आई कमला छाबरा यांचे नुकतेच निधन झाले. आता इंडस्ट्रीतून आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, महिमा चौधरीच्या आईनेही या जगाचा निरोप घेतला आहे. महिमाच्या आईचे २-३ दिवसांपूर्वी निधन झाल्याचे बोलले जात आहे. आईला गमावल्याने महिमावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिसेस चौधरी या त्यांच्या मुलगी महिमा आणि नात आरियाना यांच्या खूप जवळ होत्या. महिमा आणि आरियाना बिथरल्या आहेत. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, महिमाची आई काही दिवसांपासून आजारी होती. महिमा कॅन्सरसारख्या घातक आजारातून स्वतःला सावरत आहे.

महिमा चौधरी काही काळापासून अत्यंत वाईट स्तिथीतून जात आहे. काही वर्षांपूर्वी तिला कर्करोग झाल्याचे निदान झाले. गेल्या वर्षी 9 जून रोजी अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये याविषयी सांगितले होते की, “माझ्या ५२५व्या चित्रपट द सिग्नेचरमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी मी महिमा चौधरीला महिन्याभरापूर्वी अमेरिकेतून बोलावले होते.

आमच्या संभाषणातून तिला स्तनाचा कर्करोग झाल्याचे उघड झाले. जेव्हा महिमाने 'द सिग्नेचर' या चित्रपटासाठी काम करायला सुरुवात केली, तेव्हा तिने कॅन्सरशी झालेल्या लढाईबद्दल सांगितले होते आणि खुलासा केला होता, मी ही लढाई जिंकली आहे. याला सुमारे ३ ते ४ महिने उलटून गेले होते.

महिमा चौधरीने शाहरुख खानसोबत परदेस या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटामुळे महिमा रातोरात स्टार झाली. वृत्तांवर विश्वास ठेवला तर या चित्रपटानंतर ती एकही हिट चित्रपट देऊ शकली नाही.

महिमा प्रोफेशनलपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिने 2006 मध्ये बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. लग्नानंतर ती एका मुलीची आई झाली. तथापि, 2013 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आणि तेव्हापासून तिच्या मुलीला एकटीने वाढवत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

SCROLL FOR NEXT