मांजरेकरांचा ‘कोन नाय कोन्चा’ मराठी चित्रपट वादात; 'त्या' दृश्यांवरती महिला आयोगाचा आक्षेप Saam TV
मनोरंजन बातम्या

मांजरेकरांचा ‘कोन नाय कोन्चा’ मराठी चित्रपट वादात; 'त्या' दृश्यांवरती महिला आयोगाचा आक्षेप

दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचा 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' या मराठी चित्रपटाचा (Marathi Film) ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच वादात सापडला आहे.

श्रेयस सावंत

मुंबई : दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा 'नाय वरणभात लोन्चा, कोन नाय कोन्चा' (Nai Varanbhat Loncha, Kon Nai Koncha) हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. मात्र या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून वादाला तोंड फुटले आहे. या चित्रपटातील काही दृश्यांवर टीका होत आहे. आता राष्ट्रीय महिला आयोगानेही या दृष्यांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच त्याविरोधात केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याकडे तक्रार ही महिला आयोगाने केली आहे.

दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचा 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' या मराठी चित्रपटाचा (Marathi Film) ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच वादात सापडला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शिव्या आणि आणि अश्लील दृश्य दाखवली असून एका अल्पवयीन मुलाचे एका महिलेसोबत चुकीचे संबंध या ट्रेलरमध्ये (Trailer) दाखवले असल्याने राष्ट्रीय महिला आयोगाने (National Commission for Women) या चित्रपटावरती आक्षेप घेतल्याने हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

हे देखील पहा -

दिवंगत ज्येष्ठ नाटककार, पत्रकार जयंत पवार (Jayant Pawar) यांनी लिहिलेल्या ‘वरन भात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या कथेवर हा सिनेमा आधारित असून सिनेमाची पटकथा आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी महेश यांनी सांभाळली आहे. येत्या १४ जानेवारी म्हणजे उद्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे मात्र त्या आधिच हा चित्रपट वादग्रस्त ठरला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यसभेत शरद पवारांनी घेतली खासदारकीची शपथ

अंजनगाव पुतळा प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून बाळराजे आवारे पाटील यांना अटक

Belly Fat: वजन होईल एका आठवड्यात कमी, सकाळच्या नाश्त्यात बनवा भाज्यांचे थालीपीठ

Salman Khan : 3,225 कोटींचा मालक अन् पायात फाटके बूट; सलमान खानची अवस्था पाहून चाहते चक्रावले, VIDEO होतोय व्हायरल

Gold Rate Today: खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं १८००० रुपयांनी स्वस्त; तुमच्या शहरातील आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT