Mahesh Manjrekar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Mahesh Manjrekar : "विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही...", महेश मांजरेकरांनी का केलं असं विधान?

Mahesh Manjrekar Talk About Chhaava Success : अभिनेते महेश मांजरेकर यांनी 'छावा'च्या यशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणालं जाणून घेऊयात.

Shreya Maskar

विकी कौशलच्या 'छावा' (Chhaava ) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाला. चित्रपटात विकी कौशल (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. 'छावा' चित्रपट अनेक गोष्टींमुळे वादात राहीला आहे.

अलिकडेच एका मिडिया मुलाखतीत प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी 'छावा' चित्रपटाच्या यशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "बॉलिवूड अभिनेता विकी कौशल उत्तम कलाकार आहे. त्याचा अभिनय अप्रतिम आहे. त्याचा 'छावा' प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. चित्रपट खूप चालला. जवळपास चित्रपटाने 800 कोटींचा व्यवसाय केला. मात्र विकी कौशलने कधीच म्हणू नये की प्रेक्षक थिएटरमध्ये मला पाहायला आले. कारण अस असत तर प्रेक्षक विकी कौशलचे आधीचे चित्रपट पाहायला देखील आले असते. प्रेक्षक विकी कौशलने साकारलेले पात्र पाहायला आले होते. त्याचे या आधीचे पाच चित्रपट चालले नव्हते."

'छावा'च्या यशाबाबत बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, "माझ्या महाराष्ट्राने हिंदी सिनेइंडस्ट्रीला वाचवलंय...हे लक्षात ठेवा. 'छावा'च्या यशाचे 80% श्रेय महाराष्ट्राला तर त्यातील 90% पुण्याचे आहे. बाकी उर्वरित महाराष्ट्राला श्रेय जाते. त्यामुळे आज महाराष्ट्रच इंडस्ट्रीला तारू शकतो."

अभिनेते महेश मांजरेकर यांचा नुकताच 'देवमाणूस' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जादू दाखवली आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके आणि अभिजीत खांडकेकर हे कलाकार देखील पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

SCROLL FOR NEXT