Mahesh Manjrekar Saam tv
मनोरंजन बातम्या

Mahesh Manjrekar: आज शिवाजी महाराज असते तर...; महेश मांजरेकरांसह 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाचे कलाकार साई चरणी नतमस्तक

Mahesh Manjrekar: लवकरच महेश मांजरेकर यांचा बहुचर्चित चित्रपट 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रदर्शनापूर्वी मांजरेकरांसह चित्रपटातील कलाकार मंडळींनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले आहे.

Shruti Vilas Kadam

सचिन बनसोडे

Mahesh Manjrekar: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक व निर्माता महेश मांजरेकर यांचा बहुचर्चित चित्रपट “पुन्हा शिवाजीराजे भोसले” ३१ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी मांजरेकरांसह चित्रपटातील कलाकार मंडळींनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेऊन चित्रपटाच्या यशासाठी आशीर्वाद मागितला आहे.

साई मंदिरात पोहोचल्यावर कलाकारांनी चित्रपटाचे पोस्टर साईंच्या चरणी ठेवले आणि पूजा करून साईबाबांसमोर नतमस्तक झाले. भावपूर्ण वातावरणात मांजरेकर आणि त्यांच्या टीमने साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी मांजरेकर म्हणाले, “हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नाही, तर महाराष्ट्राच्या मातीशी, तिच्या दु:खाशी आणि शेतकऱ्यांच्या वेदनांशी जोडलेला आहे.”

यापूर्वी प्रदर्शित झालेला त्यांचा “मी शिवाजीराजे भोसले बोलतोय” हा चित्रपट मराठी माणसाच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा आवाज ठरला होता. आता त्याच विचारधारेचा वारसा पुढे नेत “पुन्हा शिवाजीराजे भोसले” या चित्रपटातून मांजरेकर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वेदना, त्यांची परिस्थिती आणि त्यांच्या संघर्षाचं वास्तव मांडणार आहेत.

महेश मांजरेकर म्हणाले, “आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर महाराष्ट्रात घडणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे पाहून त्यांना काय वाटलं असतं? हाच प्रश्न माझ्या मनात होता. त्या भावनेतून या चित्रपटाची निर्मिती केली आहे.”

“पुन्हा शिवाजीराजे भोसले” हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रत्येक संवेदनशील माणसाला अंतर्मुख करणारा ठरेल, असा विश्वास महेश मांजरेकर यांनी व्यक्त केला आहे. या चित्रपटात सिद्धार्थ बोडके , विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने ,नित्यश्री आणि सयाजी शिंदे हे मातब्बर कलाकार बघायला मिळणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - चोराला चोर म्हटले तर वाईट वाटत असेल तर नाईलाज आहे - आ. चिखलीकर यांची अशोक चव्हाण यांच्यावर टीका

तेव्हा मी वेगळा निर्णय घेईन, नाराजी अन् पक्षबदलाच्या चर्चेवर मनसेच्या संदीप देशपांडेंचे सूचक विधान|VIDEO

प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने घेतला जगाचा निरोप; सिनेसृष्टीत शोककळा

IPAC ED Raid : EDची कारवाईनं पश्चिम बंगालमध्ये खळबळ; छापेमारी चालू असतानाच IPAC च्या कार्यालयात थेट घुसल्या ममता बनर्जी

Cancer early symptoms: शरीरात हे 5 बदल दिसले तर समजा कॅन्सरची होतेय सुरुवात; जाणून घ्या लक्षणं

SCROLL FOR NEXT