Vijay Kondake Upcoming Movie Saam TV
मनोरंजन बातम्या

Marathi Movie: 'माहेरची साडी'चे निर्माते-दिग्दर्शक विजय कोंडके यांचा 'लेक असावी तर अशी' लवकरच होणार प्रदर्शित

Lek Asavi Ashi Upcoming Movie: निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडके यांनी ३० वर्षानंतर नव्या चित्रपटाची घोषणा केली.

Pooja Dange

Lek Asavi Ashi Marathi Movie: १९९१ च्या दशकात सुपरहीट ठरलेल्या चित्रपट म्हणजे 'माहेरची साडी'. या चित्रपटाची आजही चर्चा होते. अलका कुबल आणि रमेश भाटकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटामध्ये अंजिक्य देव, विक्रम गोखले, उषा नाडकर्णी यांनी भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडके यांनी ३० वर्षानंतर नव्या चित्रपटाची घोषणा केली.

विजय कोंडके यांच्या 'ज्योती पिक्चर्स' निर्मित या चित्रपटाचे नाव 'लेक असावी तर अशी' आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ भोर तालुक्यातील इंगवली येथील कोंडके फार्मवर शनिवारी करण्यात आला. कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या हस्ते या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ झाला.

यावेळी चित्रपटातील मुख्य कलाकार यतीन कार्येकर, शुभांगी गोखले, प्राजक्ता हणमघर, या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करत असलेली गायत्री दातार आणि दादसाहेब पासलकर यांच्यासह चित्रपटातील सहकलाकार व इतर मान्यवर उपस्थित होते.

अवधूत गुप्ते, वैशाली सामंत या प्रमुख गायकांसह इतरही नवीन गायकांनी या चित्रपटामध्ये गाणी गायली आहेत. विजय कोंडके आणि मंगेश कांगणे यांनी गीते लिहीली आहेत. या चित्रपटात यतीन कार्येकर, शुभांगी गोखले, प्राजक्ता हणमघर व गायत्री दातार यांच्यासमवेत ओंकार भोजने, सविता मालपेकर, सुरेखी कुड़ची, सोमेश सावंत, अभिजित चव्हाण, नयना आपटे हे कलाकार देखील आहेत.

नोव्हेंबर महिन्याअखेरीज हा चित्रपट प्रदर्शीत केला जाणार असल्याचे विजय कोंडके यांनी सांगितले. चित्रपटाची कथा ही सर्वसामान्या कुटुंबातील असल्यामुळे प्रेक्षकांना रडायला आणि हसायला लावणारा हा चित्रपट आहे. अनंतराव थोपटे यांचा हात हा माझ्यासाठी लक्ष्मीचा हात असल्यामुळे त्यांच्या हस्ते चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ करण्यात आला असल्याचे विजय कोंडके यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT