Rajkummar-Shraddha's Stree 2 Sequel: स्त्री पुन्हा येतेय; राजकुमार रावने व्हिडिओ शेअर करत दिली चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा

Rajkummar Rao-Shraddha Kapoor's Stree 2: स्त्री 2 पुन्हा 2024 मध्ये तुमच्या भेटीला येणार आहे.
Stree Movie sequel released date out
Stree Movie sequel released date outSaam TV

Horror Comedy Movie Stree Release Date: राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर ही जोडी 'स्त्री' या चित्रपटामध्ये एकत्र दिसली होती. या दोन्ही कलाकारांनी 12 एप्रिल रोजी जिओ स्टुडिओच्या कार्यक्रमात त्यांच्या हॉरर कॉमेडी चित्रपट स्त्री 2 च्या सिक्वेलची अधिकृत घोषणा केली. आता राजकुमार रावने चित्रपटाची घोषणा करणारा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले आहे की, ओ स्त्री पुढच्या वर्षी ये! ओ स्त्री 2 पुन्हा आली आहे. तुमच्या हृदयाची धडधड वाढविण्यासाठी, Jio Studios आणि Maddock Films ते चेटकीण परत घेऊन येतेय आहेत तुम्हाला तिच्या प्रेमात पाडण्यासाठी. मिलेगी मिलेगी, सबको मिलेगी स्त्री 2, 2024 मध्ये!

Stree Movie sequel released date out
Suhana Khan Post: लेक सुहाना खानची जाहिरात पाहताच कौतुक राहीलं बाजूला.. आई गौरीने केली ही खास मागणी

चित्रपटातील कलाकार राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांनी जिओ स्टुडिओच्या एका कार्यक्रमात चित्रपटाची घोषणा करण्यासाठी स्टेजवर एक स्किट सादर केले.

स्त्री या हॉरर कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले होते तर दिनेश विजन चित्रपटाचे निर्माते होते. स्किट सुरू होताच, स्त्री (चेटकीण) पार्श्वसंगीतासह मंचावर येते. 'ओ स्त्री कल आना' हे स्टेजवर मागे लिहिलेले आहे. राजकुमार राव स्टेजवर येताच स्त्रीचे भयंकर हास्य ऐकू येते.

राजकुमार म्हणतो- तू स्त्री आहेस? मी तुझ्या डोळ्यात खूप प्रेमाने पाहिले, सर्व प्रेम आणि आदर मी तुला मिळवून दिला आहे, मग तू परत का आलीस?

यानंतर स्टेजवर अंधार होतो आणि श्रद्धा कपूर प्रवेश करते. ती राजकुमार राव, पंकज त्रिपाठी आणि मंचावर उपस्थित असलेल्या लोकांना सांगते की, त्यांच्यावर मोठा संकट येणार आहे. शेवटी, पंकज त्रिपाठी सांगतात की स्त्री 2 पुन्हा 2024 मध्ये तुमच्या भेटीला येणार आहे.

वरुण धवन स्टारर फिल्म भेडिया देखील स्त्रीसारखाच हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलचीही घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com