Suhana Khan First Advertisement: बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. अलिकडेच सुहाना एका कॉस्मॅटिक ब्रँडच्या इव्हेंटमध्ये दिसली. मेबेलाइन या ब्रँडची ब्रँडचा चेहरा म्हणून सुहानाची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान शाहरुख खानच्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष मुलगी सुहानाकडे वेधले आहे. तर सुहाना खानच्या इंस्टाग्राम पोस्टवर तिची आई गौरी खान, अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन आणि शनाया कपूर यांच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
सुहाना खानने नुकतीच इन्स्टाग्रामवर ब्रँडची पहिली जाहिरात शेअर केली आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "मी मेबेलाइन न्यूयॉर्कचा नवीन चेहरा बनण्यासाठी आणि या अभूतपूर्व महिलांसोबत हा खास प्रसंग शेअर करण्यास उत्सुक आहे." तिने मेबेलाइन ब्रँड अॅम्बेसेडर अनन्या बिर्ला, अक्षा केरुंग आणि पीव्ही सिंधू यांना पोस्टमध्ये टॅग केले.
तिच्या या पोस्टवर चाहत्यांव्यतिरिक्त तिच्या कुटुंबीयांनी आणि मित्र मैत्रिणींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पहिलीच कमेंट तिच्या आईने म्हणजे गौरी खानने केली आहे, "मला आता हा मस्करा हवा आहे." सुहानाचा डेब्यू चित्रपट द आर्चीजचा सहकलाकार अगस्त्य नंदाची आई श्वेता बच्चन यांनी कमेंट केली आहे, "हे सुंदर आहे! खूपच सुंदर." सुहानाची बेस्ट फ्रेंड शनाया कपूरने लिहिले, "माय स्यू."
याशिवाय द आर्चीजच्या डायरेक्टर झोया अख्तरने स्मायली फेस कॉमेंट केला आहे. रिद्धिमा कपूर साहनीने फायर इमोजी पोस्ट केला आणि द फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाइव्हज स्टार सीमा सजदेहने "प्रेम." असे लिहिले आहे.
Suhana Khan First Advertisement: बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. अलिकडेच सुहाना एका कॉस्मॅटिक ब्रँडच्या इव्हेंटमध्ये दिसली. मेबेलाइन या ब्रँडची ब्रँडचा चेहरा म्हणून सुहानाची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान शाहरुख खानच्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष मुलगी सुहानाकडे वेधले आहे. तर सुहाना खानच्या इंस्टाग्राम पोस्टवर तिची आई गौरी खान, अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन आणि शनाया कपूर यांच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
याआधी शाहरुख खानने मुलगी सुहाना खानच्या यशावर एक पोस्ट देखील शेअर केली होती, ज्यामध्ये तो एका व्हिडिओसह तिचे अभिनंदन करताना दिसला होता.
सुपरस्टार शाहरुख खान आणि इंटिरिअर डेकोरेटर गौरी खान यांची मुलगी सुहाना खान लवकरच झोया अख्तरच्या 'द आर्चीज'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.