MS Dhoni saam tv
मनोरंजन बातम्या

MS Dhoni In Role: महेंद्र सिंह धोनीच्या नव्या इनिंगला सुरुवात, 'या' नव्या ओळखीने येणार चाहत्यांच्या समोर...

Dhoni Entertainment's : महेंद्र सिंह धोनीने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mahendra Singh Dhoni Started His Production House: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्याची निर्मिती संस्था धोनी एंटरटेनमेंटने पहिल्या तामिळ चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या मोशन पोस्टरमधून चित्रपटाचे नाव आणि कास्टचा देखील खुलासा झाला आहे.

धोनी एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनलेल्या पहिल्या त्यांची चित्रपटाचे नाव 'एलजीएम: लेट्स गेट मॉरिड'('Let's Get Married') असे आहे. या चित्रपटामध्ये नादिया, हरीश कल्याण, इवाना आणि योगी बाबू मुख्य भूमिकेत आहेत.

धोनी एंटरटेनमेंटने प्रदर्शित केलेले हे मोशन पोस्टर अॅनिमेशन वापरून बनविण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश थमिलमानी यांनी केले आहे. रमेश यांचा हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्माती धोनीची पत्नी साक्षी धोनी सिंह धोनी आहे. धोनी कमी बजेटमध्ये हा चित्रपट बनविला आहे. त्याने यात कोणतीही रिस्क घेतलेली नाही असे यावरून दिसून येते.

तामिळ अभिनेता हरीश कल्याण यांना त्यांचा चित्रपट 'प्यार प्रेम काधल' या चित्रपटानंतर प्रसिद्धी मिळाली. त्यांचा हा चित्रपट सुपर हिट ठरला. अभिनेत्री इवाना गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'लव्ह टुडे' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपट देखील हिट झाला होता. या चित्रपटापासून इवानाला ओळख मिळाली.

४१ वर्षीय धोनी सध्या आयपीएलमध्ये सक्रिय आहे. चेन्नई सुपर किंग्स या संघाचा तो कर्णधार आहे. खेळाडू म्हणून धोनी शेवटची आयपीएल खेळेल असे म्हटले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : 'आईविना जगण किती अवघडं असतं' धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ट्रेलर प्रदर्शित

घरबसल्या अनुभवा ॲक्शनचा धमाका; 'Kanguva' आता ओटीटीवर, कधी अन् कुठे पाहाल

Wedding Rituals Varmala Cermony: लग्नात वर-वधूला वरमाला का घालतात? नेमकं कारण काय, जाणून घ्या...

हे आहेत डोके आणि मानेचे प्रमुख कर्करोग, प्रतिबंधासाठी जीवनशैलीत करा हे बदल...

IND vs AUS: टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, विराट गेला होता हॉस्पिटलमध्ये, सरावावेळी २ फलंदाज जायबंदी

SCROLL FOR NEXT