Samir Chougule
Samir Chougule  Instagram @samirchoughule
मनोरंजन बातम्या

Samir Choughule Controversy : समीर चौगुले अडचणीत; हास्यजत्रेतील स्किटमुळे मागावी लागली माफी

Pooja Dange

Samir Choughule In Trouble : गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता समीर चौगुले वादात अडकला आहे. समीर चौगुले अनेक स्किटमध्ये आपल्याला विविध गाणी गाताना आणि त्यावर डान्स करताना दिसतो. यामुळेच समीर चौगुले अडचणीत आला आहे.

समीर चौगुले गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यांच्या अभिनयाने आणि कॉमेडीने वेड लावले आहे. हास्यजत्रेच्या माध्यमातून कोरोना काळातही त्यांनी आपले मनोरंजन केले आहे. समीर चौगुले यांचा चाहता वर्ग देखील आहे. परंतु आता त्यांनी विरोध होताना देखील दिसत आहे. (Latest Entertainment News)

समीर चौगुले महाराष्ट्राची हास्यजत्रेत काही स्किटच्या दरम्यान तारपा नृत्य करताना दिसतो. तारपा हा आदिवासी समाजाचे लोकनृत्य आहे. बऱ्याचदा विचित्र पद्धतीने 'तारपा' करून समीर विनोद निर्मिती करत असतो.

परंतु या नृत्याला समीर चुकीच्या पद्धतीने नाचून, त्या लोकनृत्य प्रकाराची अवहेलना करत असल्याचा आरोप आदिवासी समाजाने केला आहे. त्यावरून त्यांनी समीर चौगुलेची भेट घेऊन यावर आक्षेप नोंदवला आहे. एवढेच नाही तर समीरला त्यासंदर्भात माफी मागायला लावली आहे.

एक व्हिडिओ आदिवासी समाजाकडून शेयर करण्यात आला आहे. ज्यामध्ये समीर चौगुले तारपा नृत्य करताना दिसत आहे. त्यानंतर आदिवासी समाजातील काही कार्यकर्ते म्हणतात, 'आम्ही या प्रकाराचा निषेध करत आहोत. समीर चौगुले आणि त्यानंतर कोणत्याही कलाकाराने या नृत्य प्रकारचा अवमान करणार नाही अशी खबरदारी आम्ही घेऊ.'

त्यानंतर समीर चौगुले यासंदर्भात माफी मागताना दिसत आहे, समीर म्हणतो, 'सध्या माझ्या एका एका प्रहसनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मी तारपा नृत्य करतो असं सांगितलं होतं, पण तसं मी केलं नाही. जे स्किट मी सादर केलं त्यातून आदिवासी समाजाच्या भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या. त्याबद्दल मी सर्व आदिवासी बंधु भगिनींची माफी मागतो.'

'झालेल्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, आणि असं पुन्हा कधीच होणार नाही याची ग्वाही देतो. या स्किटमधून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतु नव्हता आणि कधीही नसतो. मी पुन्हा एकदा सर्वांची माफी मागतो' असे समीर म्हणाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: जुमला पर्व संपतंय, येत्या ४ जूनपासून अच्छे दिन येतील; उद्धव ठाकरे, शरद पवारांची भाजपवर टीका

Health Tips: या लोकांनी फणस खाऊ नये

Today's Marathi News Live: अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानातील सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

Vastu Tips: घरात मनी प्लांट लावताना या चुका टाळा; अन्यथा प्रगती थांबेल

Khadakwasla Dam Water Level: पुणेकरांना दिलासा, पाणीकपातीचे संकट टळलं; जाणून घ्या खडकवासला धरण साखळी पाणीसाठ्याची स्थिती

SCROLL FOR NEXT