Om Raut On Adipurush : अखेर चित्रपटाला न्याय मिळाला; आदिपुरुषचा फायनल ट्रेलर पाहून ओम राऊतवर कौतुकाचा वर्षाव

Om Raut : ओम राऊत यांनी आदिपुरुष या चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीला एक नवीन रूप देण्यासाठी सज्ज आहेत.
Adipurush Success Story
Adipurush Success StoryInstagram
Published On

Om Raut Gets Appreciated After Adipurush Final Trailer : ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष चित्रपटाचे फायनल ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. ओम राऊत आदिपुरुष चित्रपटावर खूप मेहनत घेताना दिसत आहे. दिग्दर्शक व्हिएफएक्स आणि कलाकारांच्या लूकमुळे ट्रोल चालेल्या या चित्रपटाला आणखी दमदार बनविण्यासाठी ओम राऊत यांनी चित्रपटाची रिलीज डेट पुढे धाकली आणि चित्रपट पुन्हा काम सुरू केलं. चित्रपटामध्ये बदल करून ओम राऊत एक बिग बजेट सिनेमा घेऊन येत आहात, ज्यामुळे सर्वत त्यांचे कौतुक होताना दिसत आहे.

ओम राऊत यांनी आदिपुरुष या चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीला एक नवीन रूप देण्यासाठी सज्ज आहेत. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपटाचे आणि दिग्दर्शक ओम राऊत यांचे कौतुक करत आहेत. हॉलीवूड चित्रपटाच्या बरोबरीने असा चित्रपट बनवला गेल्याचे बोलले जात आहे. ओम राऊत यांनी घेतलेल्या निर्णयाचे आणि चित्रपटामध्ये केलेल्या बदलांचे कौतुक होत आहे. (Latest Entertainment News)

Adipurush Success Story
Bigg Boss OTT 2 Contestants List: बिग बॉस ओटीटीच्या नव्या पर्वात दिसणार हे सेलिब्रिटी; जिया शंकर, संभावना सेठ, पूनम पांडेसह अनेक नावांची चर्चा

आदिपुरुषचा अंतिम ट्रेलर प्रेक्षकांना खूप आवडला आहे. रामायणाच्या महाकाव्यापासून प्रेरित असलेला आणि दमदार VFX असलेला हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. अनेकांना माहीत नसेल, पण आदिपुरुषचे चित्रीकरण ब्लू स्क्रीन स्टुडिओमध्ये झाले आहे. हा चित्रपट बनविणे खूप आव्हानात्मक काम होते. ज्या पद्धतीने हा चित्रपट बनविण्यात आला आहे, खरोखरच कौतुकास्पद आहे.

चित्रपटाचा ट्रेलर पाहून ओम राऊत यांचे कौतुक करत लोक त्यांना विविध प्रतिक्रिया देखील देत आहेत. हॉलिवूड तोडीसतोड चित्रपट बनविल्याचे दिग्दर्शकाच्या प्रयत्नाचे कौतुक केले जात आहे.

आदिपुरुषा चित्रपटातील संवाद देखील तितकेच दमदार आहेत. चित्रपटातील संवाद ऐकून अंगावर काटा नक्कीच येईल. प्रभास आणि क्रिती सेनन स्टारर चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे आणि टी-सीरीजचे भूषण कुमार आणि कृष्ण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार आणि यूव्ही क्रिएशन्सचे रेट्रोफिल्स, प्रमोद आणि वामसीचे राजेश नायर यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट 16 जून 2023 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com