Marathi Actress Wedding saam tv
मनोरंजन बातम्या

Marathi Actress Wedding : मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्यासोबतचा पहिला फोटो आला समोर

Esha Dey Marriage : महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. लग्न सोहळ्याचे खास फोटो समोर आले आहेत. अभिनेत्रीने आपल्या कॉमेडी शैलीने प्रेक्षकांना खूप हसवले आहे.

Shreya Maskar

महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्रीचा थाटामाटात लग्न सोहळा पार पडला.

अभिनेत्री ईशा डेच्या नवऱ्याचे कला क्षेत्राशी खास नाते आहे.

लग्न सोहळ्याचे सुंदर फोटो समोर आले आहेत.

मनोरंजन सृष्टीत सध्या लग्नसराई पाहायला मिळत आहे. एका मागोमाग एक कलाकार विवाह बंधनात अडकले आहेत. अशात आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री ईशा डे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला आहे. ईशाने लेखक-गीतकार अभिषेक खणकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. ईशाच्या लग्न सोहळ्याचे खास फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

ईशा आणि अभिषेकच्या लग्न सोहळ्याला त्यांचे मित्र, कुटुंब आणि हास्य जत्रेचे कलाकार पाहायला मिळाले. अभिनेत्री वनिता खरातने लग्न सोहळ्याचे खास फोटो शेअर केले आहे. तसेच नवीन जोडप्याला खूप आशिर्वाद दिले आहेत. ईशा आणि अभिषेकने लग्न सोहळ्यासाठी पारंपरिक लूक केला होता. ईशाने सुंदर काठापदराची लाल रंगाची साडी नेसली होती. त्यावर सोनेरी काठ असलेली शाल, गळ्यात हार, नाकात नथ, हातात हिरवा चुडा अशा मराठमोळ्या साज श्रृंगारात ईशा खूपच सुंदर दिसत होती.

अभिषेक खणकर कोण?

ईशा डेचा नवरा अभिषेक खणकर हा प्रसिद्ध गीतकार आहे. 'खुलता कळी खुलेना', 'लक्ष्मी निवास' या लोकप्रिय मालिकांसाठी गीतकार म्हणून त्याने काम केले आहे. तसेच त्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले आहे. त्याने मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या 'अनन्या' चित्रपटातील 'तू धगधगती आग' हे गीत लिहिलं आहे.

ईशा डे वर्कफ्रंट

ईशा डे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली. तसेच ईशाने 'गुलकंद' चित्रपटात काम केले आहे. ईशाला देखील पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. सध्या ईशा डे आणि अभिषेक खणकर चाहते, कलाकार, मित्रमंडळी आणि कुटुंब यांच्याकडून प्रेमाची, शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'नीट'ची परीक्षा पुन्हा देण्याची हिंमत नाही; तरुणी विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

शेतकरी कर्जमाफीनंतर राज्य सरकारनं पशुपालक, कुक्कुटपालकांसाठी घेतला मोठा निर्णय,बळीराजाला आले 'अच्छे दिन'

सामच्या बातमीचा इम्पॅक्ट: नीट पेपरफुटीनंतर त्या इंटिग्रेटेड महाविद्यालयांवर होणार कारवाई, शिक्षण विभागाचे आदेश

Maharashtra News Live Update: आदिवासी बांधवाच्या जागेवर बेकायदेशीर घरकूल बांधकाम

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ११ उमेदवारांची घोषणा; कोण-कोणाला मिळालं तिकीट? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT