Rohit Mane Viral Photos Instagram/ @mane_ya._.na_mane
मनोरंजन बातम्या

Rohit Mane Viral Post: महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील रोहित माने 'लिप लॉक' फोटोनंतर ट्रोल, नेटकरी म्हणाले...

नुकतेच रोहित मानेचे त्याच्या पत्नीसोबतचे काही फोटोज तुफान व्हायरल होत आहेत.

Chetan Bodke

Rohit Mane Viral Post: गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर सेलिब्रिटींची एक खास अंदाजातील पोज सध्या व्हायरल होत आहे. ती पोज म्हणजे 'लिप लॉक'. महाराष्ट्राची हास्यजत्रेतील अनेक कलाकार सध्या आपल्या रिलेशनमुळे बरेच चर्चेत आहे. त्यातच नुकते वनिता खरातने सुमित लोंढेशी लग्नगाठ बांधली होती. प्रीवेडिंग फोटोशूटमध्ये वनिताने काढलेले फोटो बरेच व्हायरल झाले होते. नुकतेच एका अभिनेत्याचे आपल्या पत्नीसोबतचे काही फोटोज तुफान व्हायरल होत आहेत.

या अभिनेत्याने त्याच्या पत्नीसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केलेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्याने पोस्ट शेअर केली असून त्यातील लिपलॉक फोटोची खास चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. अभिनेता रोहित मानेचे आपल्या पत्नीसोबतचे खास पोजमधील फोटो बरेच चर्चेत आहे. दोन वर्षांपूर्वी १२ फेब्रुवारी रोजी रोहित आणि श्रद्धा लग्नबंधनात अडकले होते. लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने पत्नीसोबतचे हे रोमँटिक फोटो शेअर केलेत.

त्यांचे लग्नानंतरचे किसिंग करणारे फोटो सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने हा फोटो 'बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. लव्ह यू' अशी कॅप्शन देत फोटो पोस्ट केले आहे. त्यांच्या फोटोंना चाहत्यांनी हार्ट इमोजी देत कमेंट केले आहे. तर अनेकांनी त्यांना लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. तर काहींनी त्याला ट्रोलही केले आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये समीर चौगुले, गौरव मोरे, वनिता खरात, प्रथमेश शिवलकर, श्रमेश बेटकर, निखिल बने, नम्रता संभेराव, दत्तू मोरे या कलाकारांसोबतच रोहित मानेची कॉमेडीही प्रेक्षकांना फार आवडते. रोहितची स्टाइल नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. विविध पात्रांप्रमाणे बदलणारी त्याची भाषेचा लहेजा प्रेक्षकांना भावतो. दरम्यान रोहित सोशल मीडियावरही विशेष सक्रिय असतो. हास्यजत्रेच्या सेटवरील फोटोंसोबत तो वैयक्तिक आयुष्यातील फोटोंनी चर्चेत असतो. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर पत्नीसोबतचे विविध फोटोशूटही शेअर केलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ: राजकोटच्या मैदानावर केएल राहुलचा जलवा, शतकानंतर खास सेलिब्रेशन; भारताचं न्यूझीलंडसमोर २८५ रन्सचं आव्हान

Maharashtra Live News Update: धुळ्यात मतदानापूर्वीच खळबळ, देवपूरमध्ये शेकडो मतदान कार्डांचासाठा

Facial Hair in Women: महिलांना दाढी मिशी का येते? माहितीये का कारण?

मुंबईत मोठा राडा; ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची हाणामारी, नेमकं काय घडलं?

Lighweight Saree Designs: दिवसभर साडीत राहायचंय? मग हलक्या साड्यांचे 'हे' 5 लेटेस्ट पॅटर्न नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT