Onkar Raut Shared Actor Ashok Saraf Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Onkar Raut : ओंकार राऊतचं हास्यजत्रेतलं काम पाहून अशोक सराफ यांनी केलं तोंडभरून कौतुक, अभिनेत्याने शेअर केली खास पोस्ट

Onkar Raut Shared Actor Ashok Saraf Post : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी हजेरी लावली होती. यावेळी ओंकार राऊतच्या अभिनयाचे अशोक सराफ यांनी कौतुक केले.

Chetan Bodke

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. या शोची लोकप्रियता फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतात आणि जगभरात आहे. हास्यजत्रेने अनेक नव्या नवख्या कलाकारांना संधी दिली आहे. या शोच्या माध्यमातून अनेक कलाकारांच्या प्रसिद्धीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे, ओंकार राऊत. ओंकार राऊतने आपल्या कॉमेडीच्या जोरावर विशेष प्रसिद्धी मिळवली आहे.

नुकतीच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या एपिसोडमध्ये, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी हजेरी लावली होती. यावेळी ओंकार राऊतच्या अभिनयाचे अशोक सराफ यांनी कौतुक केले. अशोक सराफ यांनी ओंकारच्या अभिनयाचे कौतुक केल्यानंतर त्याने खास इन्स्टा पोस्ट शेअर केली आहे.

पोस्टमध्ये ओंकार राऊतने लिहिले की,

“बरोबर दहा वर्षांनी भेट झाली! खूप छान वाटलं! काय लिहू? काय नको? हे कळत नाहीये. तुमच्या सोबत काम करण हे अनेकांचं स्वप्न असत आणि ते स्वप्न माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकातच पूर्ण झालं! तेव्हा जे जे तुमच्याकडून शिकलो ते आता थोडफार वापरण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला भेटून तुम्ही माझ्याशी काय बोलाल याची उत्सुकता होती. “आता अजून चांगल करायला लागलास रे!! गुड! कीप इट अप!!” हे वाक्य तुमच्या तोंडून ऐकलं आणि मी धन्य झालो!! Thank You अशोक मामा!! MHJ चे skits बघताना तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाच जास्त भारी वाटलं.”

ओंकार राऊतने ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्याचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे. ओंकार एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता असून त्याने मराठी रंगभूमीवरही आणि मराठी सिनेसृष्टीतही काम केले आहे. त्याशिवाय तो वेबसीरीजमध्येही दिसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

Putin -Jinping Immortal: पुतीन आणि जिनपिंग अमर होणार? चीन-रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडे कोणती जडीबुटी?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Baaghi 4 Cast Fees : टायगर श्रॉफ ते श्रेयस तळपदे, 'बागी 4'साठी कोणी किती घेतलं मानधन?

SCROLL FOR NEXT