Prithvik Pratap With Mother  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prithvik Pratap: स्वप्नांपासून… सत्यापर्यंत..! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापची आईसाठी खास पोस्ट, म्हणाला - 'हार नाही मानणार…'

Maharashtrachi Hasya Jatra Fame Prithvik Pratap: काही दिवसांपूर्वी पृथ्वीकने मुंबईत स्वत:चं घर खरेदी केले. मुंबईत स्वत:चं हक्काचं घर असावं हे त्याचे स्वप्न या माध्यमातून पूर्ण झालं. आता पृथ्वीकचे आणखी एक स्वप्न पूर्ण झाले आहे.

Priya More

Maharashtrachi Hasya Jatra:

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasya Jatra) या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहचलेला अभिनेता पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. एकांकिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रामध्ये आलेल्या पृथ्वीकने मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वी पृथ्वीकने मुंबईत स्वत:चं घर खरेदी केले. मुंबईत स्वत:चं हक्काचं घर असावं हे त्याचे स्वप्न या माध्यमातून पूर्ण झालं. आता पृथ्वीकचे आणखी एक स्वप्न पूर्ण झाले आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत लाडक्या आईसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

काही महिन्यांपुर्वी एका मुलाखतीत पृथ्वीक प्रतापने सांगितले होते की, 'माझं एक बेसिक स्वप्न आहे की, मला एक पेन्टहाऊस घ्यायचं आहे. ज्यात एक मोठी राजाच्या आसनासारखी खुर्ची असेल. ज्याच्यावर माझी आई बसेल आणि म्हणेल की, 'हे माझं घर आहे मला याचं भाडं नाही द्याव लागणारं.' पृ्थ्वीकचं हे छोटसं स्वप्न आता पूर्ण झालं आहे. त्याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर आईचे दोन फोटो शेअर केले आहे. पहिल्या फोटोमध्ये पृथ्वीकची आई त्याच्या घरामध्ये मोठ्या खुर्चीवर बसलेली दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये पृथ्वीकच्या आईसोबत त्याची मुलगी जाई देखील दिसत आहे. हे दोन्ही फोटो पोस्ट करत त्याने आईसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

पृथ्वीकने आईचे फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आजपासून ६ महिन्यांपूर्वी @rajshrimarathi च्या एका इंटरव्यूमध्ये माझं एक स्वप्न मी जगासमोर बोलून दाखवलं.. तेव्हा कल्पना ही नव्हती की अगदी सहा महिन्यात universe माझ्या प्रयत्नांना योग्य वाट दाखवेल.. आज आईला आणि जाईला स्वतःच्या घरात खुश पाहून भरुन पावलोय. तरीही अजून Penthouse आणि Queen’s Throne बाकी आहे. पण साला हार नाही मानणार… कारण मध्यमवर्गीयांची स्वप्न आणि त्यांच्या शर्यती, फक्त बघण्यासाठी नाही पूर्ण करण्यासाठी असतात.'

पृथ्वीक प्रतापच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांनी खूप चांगली पसंती दिली आहे. त्याच्या या पोस्टवर कमेंटस करत चाहत्यांनी त्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट्समध्ये लिहिले की, 'खूप छान... पालकांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचं कारण आपण असणं यापेक्षा आणि काय हवं? अभिनंदन पृथ्विक' तर आणखी एका चाहत्याने 'फक्त प्रचंड अभिमान', अशी कमेंट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Card: एसटी प्रवाशांना दिलासा, NCMC कार्डच्या प्रक्रियेत मोठा बदल

Political News: मोठी बातमी! उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा, वसंत डावखरे प्रकरणात १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

Maharashtra News Live Update: गणेश विसर्जनासाठी पुणे पोलिसाचा चोख बंदोबस्त

Food For Weight Loss: पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात समावेश करा हे ७ पदार्थ; वजन होईल झपाट्याने कमी

Placenta percreta: मूत्राशयापर्यंत पोहोचली होती प्लॅसेंटा; प्रसूतीपूर्वीच धोका ओळखला, डॉक्टरांच्या मेहनतीने गर्भवती महिलेवर यशस्वी उपचार

SCROLL FOR NEXT