Instagram /@prasadmkhandekarofficial
मनोरंजन बातम्या

Prasad Khandekar Lost Instagram: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून खळखळून हसवणाऱ्या प्रसाद खांडेकरला 'सोशल' धक्का; लाखो चाहते गमावले

Prasad Khandekar News Account: प्रसाद खांडेकरने त्याचे नवीन इंस्टाग्राम अकाउंट सुरू केले आहे.

Pooja Dange

Prasad Khandekar Opn New Instagram:

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरात पहिला जातो. टीव्हीवर धुमाकूळ घालणाऱ्या या कलाकारांना सोशल मीडियावर देखील कमाल केली आहे. सोशल मीडियावर या कलाकारांचे लाखो फॉलोवर्स आहेत.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारांच्या फॉलोवर्समध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र या कार्यक्रमातील कलाकार प्रसाद खांडेकरचे फॉलोवर्स कमी झाले आहेत.

प्रसाद खांडेकर गेल्या दोन महिन्यापासून सोशल मीडियावर सक्रिय नाही. प्रसाद खांडेकरने त्याचे जुने इंस्टाग्राम अकॉउंट सुरु करण्याचे खूप प्रयत्न केले. पण काही तांत्रिक कारणांमुळे ते अकाउंट सुरू झालेच नाही.

आज प्रसाद खांडेकरने त्याचे नवीन इंस्टाग्राम अकाउंट सुरू केले आहे. तर त्याच्या फॅन्सला सांगितले आहे की त्याचे जुने अकॉउंट तो वापरता नाही. पण त्याने फॉलोवर्स गमावल्याचे दुःख व्यक्त केले आहे.

प्रसाद खांडेकर त्याच्या फॅन्सला नवीन अकॉउंट वरून पोस्ट करत लिहिले आहे की, साधारण दोन महिन्यांपासून माझं इन्स्टंग्राम अकाऊंट बंद आहे आणि बरेच जण विचारतायत अकाऊंट कधी सुरू होणार .....म्हणून त्या साधारण 85000 फॉलोअर्स वर पाणी सोडून पुन्हा नव्याने अकाऊंट ओपन करतोय ....लिंक वर शेअर केलीय पटकन फॉलो करा धन्यवाद.'

प्रसादच्या या नवीन अकॉउंटवर त्याचे फॉलोवर्स पुन्हा येऊ लागले आहेत. आता प्रसादाचे २४३२ फॉलोवर्स आहेत. प्रसादच्या या पोस्टवर त्याचे सहकलाकार नम्रता संभेराव आणि समीर चौघुले यांनी कमेंट केल्या आहेत.

प्रसाद सोशल मीडियावर खूप सक्रिय होता. काही कारणांस्तव त्याचे जुने खाते इंस्टाग्रामने बंद केले होते. तसेच त्याला नवीन खाते बनविण्यास सांगितले होते. प्रसादने दोन महिन्यापूर्वी इंस्टाग्रामकडे याची तक्रार देखील केली होती. परंतु इंस्टाग्रामला ते खाते पुन्हा चालू करता आले नाही. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

SCROLL FOR NEXT