सध्या मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे बरेच चर्चेत आले आहेत. या वर्षी प्रदर्शित झालेला ‘महाराष्ट्र शाहीर’ आणि ‘बाईपण भारी देवा’ या दोन चित्रपटांमुळे ते बरेच चर्चेत आले आहेत. ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटामध्ये दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपल्या आजोबांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट बनवला आहे. आज शाहीर साबळे यांचा जन्मदिवस आहे. आपल्या आजोबांच्या वाढदिवसानिमित्त केदार शिंदेंनी मनातली खंत व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे.
दिग्दर्शक केदार शिंदे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “बाबा. शाहीर साबळे.. ३ सप्टेंबर हा तुमचा जन्मदिवस. आज जन्मशताब्दी वर्षाची सांगता होईल. मी २०१९ मध्ये जे ठरवलं ते स्वामी कृपेने पुर्ण झालं. तुमच्या आयुष्याचं डॉक्यूमेंटेशन झालं. ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर आज ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमा उपलब्ध आहे. पुढच्या कित्येक पिढ्या तुम्हाला विसरणार नाहीत याची खबरदारी घेतली आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट, निर्माते संजय छाब्रिया आणि अभिनेता अंकुश चौधरी यांच्या मदतीने हे शक्य झालं. शासनाने तुमची दखल गांभीर्याने घेतली नाही याचं शल्य आयुष्यभर मनात राहील. पण कुणावर का अवलंबून रहायचं? याची शिकवण याच काळात मिळाली.”
आपल्या पोस्टमध्ये दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, “मी पुढे दिग्दर्शक म्हणून कसा आहे?? हे सांगणं मला अवघड असलं तरी, मी शाहीरांचा नातू म्हणून कसा आहे? याविषयी लोकं भरभरून बोलतील याची मला खात्री आहे. माझ्या आजोबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? यासाठी एक सिनेमा पाहिला तरी समजून येईल. माझी नातवंड जेव्हा विचार करतील की, आपल्या आजोबांनी काय केलं? त्यांच्यासाठी बस्स एक तुमचा सिनेमा पाहिला तरी खुप झालं!!!” अशी पोस्ट दिग्दर्शकांनी शेअर केली आहे.
दरम्यान केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर, चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अंकुश चौधरी आणि सना शिंदे चित्रपट ७ कोटींमध्ये निर्मित झालेला आहे. या चित्रपटाने एकूण बॉक्स ऑफिसवर ७.३५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाची कथा शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.